Vir Das Controversy: बंगळूरमध्ये वीर दासचा शो रद्द, कॉमेडियनने स्वतः पोस्ट करत दिली माहिती Bollywood Actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vir Das Bengaluru show cancelled

Vir Das Controversy: बंगळूरमध्ये वीर दासचा शो रद्द, कॉमेडियनने स्वतः पोस्ट करत दिली माहिती

Vir Das: गेल्या वर्षी स्टँड-अप कॉमेडीयन वीर दासच्या एका वाक्याने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला होता. 'मी अशा दोन भारतातून आलो आहे' या त्याच्या वाक्याने वर्षभरापूर्वी देशात जोरदार खळबळ उडवून दिली होती, त्यावेळी त्याच्यावर भारताची बदनामी केल्याबद्दल टीका झाली होती.(Vir Das Bengaluru show cancelled)

हेही वाचा: Malaika Arora: अर्जुन-मलायका बोहल्यावर?, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण...

आज स्टँड-अप कॉमेडियन वीर दासचा बंगळुर येथील कार्यक्रम हिंदूत्ववादी संघटनांच्या निषेधानंतर शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला. हा शो रद्द करण्यामागचं खरं कारण समजले नाही, पण या शोमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा आरोप करत फ्रिंज आउटफिट्सने शोला विरोध केला.

हेही वाचा: Priyanka Chopra:'लखनऊमध्ये संध्याकाळी सातनंतर बाहेर पडणं म्हणजे..',महिलांच्या सुरक्षेवर प्रियांकाची नोट

"काही अचानक आलेल्या समस्यांमुळे , वीर दासचा स्टँड-अप कॉमेडी शो रद्द करण्यात आला आहे'', असे YOSN इनोव्हेशनने चौदय्या मेमोरियल हॉलच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुर येथे मल्लेश्वरममधील चौदय्या मेमोरियल हॉलमध्ये आज संध्याकाळी 5.30 वाजता हा शो होणार होता.

या कार्यक्रमाचे आयोजक इनोव्हेशन होते. इनोव्हेशनने एका निवेदनात म्हटले आहे की हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा: Alia Bhatt Discharged: हॉस्पिटलमधून घरी परतली आलिया, रणबीरच्या कुशीत चिमुकलीची पहिली झलक...

शो रद्द केल्या बद्दल हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते मोहन गौडा म्हणाले की,''विनोदी कलाकाराने भारतातील महिला आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे''.

“आम्ही या शोविरोधात व्यालीकवल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हिंदू संघटनांच्या आंदोलनामुळे हा शो रद्द करण्यात आला आहे. कॉमेडीच्या नावाखाली असे लोक हिंदू धर्माचा अपमान करतात तिथे बहिष्कार टाकला पाहिजे आम्ही ते सहन करणार नाही असे गौडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे''. तर आपला शो रद्द झाल्याची माहिती स्वतः वीर दासने देखील सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.