Vivek Agnihotri: 'काश्मीर फाईल्स'वर 'वेबसीरिज'? दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय अत्याचार हा प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर आणला होता.
vivek agnihotri
vivek agnihotrigoogle

The Kashmir Files Movie: काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय अत्याचार हा प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर आणला होता. त्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात संमिश्र स्वरुपाच्या (Social Media News) प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. देशाचे उपराष्ट्रपती ते पंतप्रधान या सर्वांनी या चित्रपटाचे कौतूक करुन वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले होते. यासगळ्यात सोशल मीडियावर काश्मिर फाईल्सविषयी जो प्रचार सुरु होता (Bollywood Movies) त्याचाही मोठा परिणाम प्रेक्षकांवर झाल्याचे दिसून आले. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 150 कोटींपेक्षा जास्त कमाई करुन लक्ष वेधून घेतले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. त्यांनी बॉलीवूडच्या प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शकांवर सडेतोड भाष्य केले होते. आपल्या चित्रपटाचं साधं कुणीही कौतूक केलं नाही. असा आक्षेप अग्निहोत्री यांचा होता. यासगळ्यात त्यांचा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असल्याची बातमी व्हायरल होताच त्यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं अग्निहोत्री यांच्यावर टीका करुन काश्मिर फाईल्सच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

सोशल मीडियावर अग्निहोत्री यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी आपण आता एक वेबसीरिजच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे म्हटले आहे. त्या सीरिजचा विषय कोणता, त्यात कोणते अभिनेते असणार, ती केव्हा प्रदर्शित होणार याविषयी कोणताही खुलासा अद्याप समोर आलेला नाही. अग्निहोत्री यांच्या ट्विटला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

vivek agnihotri
'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

काश्मीर फाईल्सवरती ही सीरिज असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एका युझर्सनं म्हटलं आहे की. सर आपण जी चित्रपट निर्मिती केली त्यातून एखादा प्रभावी माहितीपटही निर्मिती होऊ शकते. आपण त्याचा विचार करावा. आम्हाला त्या माहितीपटाची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्निहोत्री त्यांच्या विविध वक्तव्यांवरुन चर्चेत आले आहे.

vivek agnihotri
Alia Bhatt चे डोहाळे जेवण,सोहोळ्यासाठी नीतू कपूर यांची खास अट चर्चेत...

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com