Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रींच्या विरोधात शशी थरुर यांची कोर्टात धाव, काय आहे कारण?

अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे.
Vivek Agnihotri The Vaccine War Director Controversial Statement
Vivek Agnihotri The Vaccine War Director Controversial Statementesakal

Vivek Agnihotri The Vaccine War Director Controversial Statement : द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा आता द व्हॅक्सिन वॉर हा चर्चेत आला आहे. त्यांनी त्यावरुन केलेलं एक धक्कादायक वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

अग्निहोत्री यांनी ज्याप्रकारे आरोप केले त्याची तीव्रता लक्षात घेऊन आपण त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा क़ॉग्रेसचे थिरुवअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांनी दिला आहे. थरुर यांनी कोविडच्या काळात काही परदेशी व्हॅक्सिनचे प्रमोशन केले त्यासाठी त्यांना संबंधित कंपन्यांकडून पैसेही मिळालेत असेही अग्निहोत्री म्हणाले होते.

Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

यासगळ्यात थरुर यांनी देखील अग्निहोत्री यांच्याबाबत आक्रमक धोरण स्विकारत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रियतेसाठी त्यांनी अशाप्रकारचे विधान केले असून आपण याबाबत कायदेशीर सल्लाही घेणार आहोत. असेही म्हटले आहे.

अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सिन वॉर हा उद्या प्रदर्शित होतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी अग्निहोत्री हे त्यांच्या द काश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आले होते.

एक्सवर अग्निहोत्री यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी बॉलीवूडचे सेलिब्रेटी कोणत्या वस्तूंचे प्रमोशन करतात, त्या वस्तू ते स्वत वापरतात का हा प्रश्न आपल्याला पडत नाही. यात कित्येक मोठ्या कलावंतांचा समावेश आहे. यासगळ्यात कोविड्च्यावेळेस व्हॅक्सिन प्रकरणात एक प्रकार घडला होता.

Vivek Agnihotri The Vaccine War Director Controversial Statement
Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

थरूर यांनी एका परदेशी कंपनीच्या व्हॅक्सिनचे प्रमोशन केले होते. त्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यावरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशाप्रकारचे व्यवहार करत असतील तर काय बोलायचे, असा प्रश्नही अग्निहोत्री यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com