Vivek Agnihotri: "एकच बाप ठेवा",गांधी पुण्यतिथी निमित्त विवेक अग्नीहोत्रीचं जळजळीत ट्विट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri: "एकच बाप ठेवा",गांधी पुण्यतिथी निमित्त विवेक अग्नीहोत्रीचं जळजळीत ट्विट चर्चेत

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 75वी पुण्यतिथी आहे. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र त्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहूल गांधी यांच्याबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'बापूंनी संपूर्ण देशाला प्रेमाने, सर्व धर्म समानतेने जगायला आणि सत्यासाठी लढायला शिकवले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम."

राहुल गांधींच्या या ट्विटला रिट्विट करत आरजे सायमाने लिहिले की, 'बापू, तुम्ही हा हिंदुस्थान बनवला. फक्त तुमचाच असेल. जय हिंद.' आता विवेक अग्निहोत्री यांनी आरजेच्या ट्विटवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी लिहिले की, 'कधी म्हणतात की हा हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही'. कधी म्हणतात बापूंचा आहे . कधी कधी मुघलांनी भारत बनवला असे म्हटले जाते. कधी कधी इंग्रजांनी बनवले असे म्हणतात.कधी नेहरूंनी बनवलं असं म्हटलं जातं. तुम्ही निवडू शकता असा एकच पिता नाही का? विचित्र लोक विचित्र गोष्टी.'

विवेक अग्निहोत्रींच्या या ट्विटवर आता सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, 'किमान सावरकर किंवा गोडसेने देश घडवला असं कोणीही म्हणत नाही'. तर दुसऱ्याने लिहिले की, 'विवेक हा देश सावरकरांनी तर बनवला नाही. किमान आम्ही याची हमी देऊ शकतो. एका यूजरने लिहिले की, 'तुला ही गोष्ट समजणार नाही'.