...म्हणून वाणी कपूरने यशराजमधून घेतला काढता पाय; वाचा सविस्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 जुलै 2020

अभिनेत्री वाणी कपूरने यशराज बॅनर्सच्या 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर ती गेली आठ वर्षे यशराज बॅनर्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होती.

मुंबई : अभिनेत्री वाणी कपूरने यशराज बॅनर्सच्या 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर ती गेली आठ वर्षे यशराज बॅनर्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होती. त्यामुळे बाहेरचे चित्रपट ती स्वीकारू शकत नव्हती. मात्र आता तिने बाहेरच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट स्वीकारला आहे. तो चित्रपट आहे 'बेल बॉटम' आणि ती या चित्रपटात भारत कुमार अर्थात अक्षय कुमारबरोबर काम करीत आहे. 

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

'बेल बॉटम' ही एक पीरियड फिल्म आहे आणि मागील वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील बाहेर आला आहे. रणजित एम. तिवारी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. 1980 च्या दशकातील कहाणी या चित्रपटात आहे. वाणी कपूर या चित्रपटात मिटी नावाची व्यक्तिरेखा साकारीत आहे. तिची भूमिका मजेशीर आणि गमतीशीर आहे. पूजा एन्टरटेन्मेंटचा हा चित्रपट आहे. 

मंत्री महोदय म्हणतात, 'कोरोनिल'ने कोरोना बरा होत नाही; खबरदार संभ्रम निर्माण केला तर...

याबद्दल वाणी कपूर म्हणते, की अक्षय कुमारबरोबर काम करताना मजा येणार आहे. मी प्रॉडक्शन हाऊसची खूप आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली आणि मी नक्कीच माझी कामगिरी उत्तम करीन. आता मी बाहेरील प्रॉडक्शन हाऊसचे चित्रपट स्वीकारणार आहे. जॅकी भगनानी यांचे मी याबद्दल आभार मानते. त्यांनी मला या भूमिकेसाठी योग्य समजले. 

...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...

जॅकी भगनानी म्हणाला, की वाणी ही हुशार आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिने चांगले चित्रपट केले आहेत. त्यामुळे आम्ही तिला या चित्रपटासाठी घेतले आहे. वाणी कपूरचे यशराजबरोबरचा करार संपला आहे म्हणून ती बाहेरचे चित्रपट करणार आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी बाहेरचे चित्रपट स्वीकारण्याचे नेमके कारण काय आहे हे अद्याप समजलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wani Kapoor left yashraj production for the new films