अभिषेक बच्चन 'स्कॅम 1992' चा हिरो असता तर... दिग्दर्शक हंसल मेहतांचे धाडसी वक्तव्य

ईश्क है तो रिस्क है या संवाद आता बहुतांशी प्रेक्षकांना माहिती झाला आहे.
Hansal Mehta and abhishek bachchan news
Hansal Mehta and abhishek bachchan news esakal

Scam 1992: ईश्क है तो रिस्क है या संवाद आता बहुतांशी प्रेक्षकांना माहिती झाला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992 या वेबसीरिजमधील संवादानं (Web serise) प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली होती. हर्षद मेहतानं 1992 झाली शेयर मार्केट प्रकरणात जो मोठा घोटाळा केला त्यावर आधारित या (Actor Abhishek Bachchan) मालिकेमध्ये हर्षदची भूमिका प्रतिक गांधी या अभिनेत्यानं केली होती. त्याच्या भूमिकेचं प्रचंड प्रमाणात कौतूक झालं. सोनी लिव्ह या ओटीटीवर ही मालिका (Ott News) प्रदर्शित झाली होती. त्याला स्कॅम 1992 मुळे मोठं यश मिळालं. त्या ओटीटी प्लॅटफॉर्मला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक धाडसी वक्तव्य केलं आहे.

मुंबईत पार पडलेल्या त्या कार्यक्रमामध्ये मेहता यांनी अभिषेक बच्चनवर टिप्पणी केली आहे. वास्तविक जेव्हा स्कॅम 1992 प्रदर्शित झाला त्याच्या काही महिन्यांनी अभिषेक बच्चनचा देखील त्याच घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. (Director Hansal Mehta) त्याच्या आधारावर मेहता यांनी अभिषेक बच्चनबाबत एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले मी जर अभिषेकला घेऊन स्कॅम 1992 हा चित्रपट केला असता तर तो काही चालला असता असे मला वाटत नाही. प्रतिक गांधीनं त्यात जीव ओतला आहे. त्यानं ज्याप्रकारे हर्षद मेहताची भूमिका साकारली ती पाहून आपल्याला त्याचे कौतूक करावेसे वाटतेच.

तुम्ही जेव्हा ओटीटीवर काम करता तेव्हा तुमच्या मालिकेत मोठा कलाकार हवा असा आग्रह असता कामा नये. तो नसला तरी काहीही बिघडत नाही. येथे तुम्हाला कंटेट जास्त महत्वाचा असतो. तो जर सक्षम आणि प्रभावी असेल तर काहीही चिंता करण्याची गरज नाही की, तुमच्या मालिकेत कोण काम करत आहे ते, आतापर्यत ज्या मालिका हिट झाल्या आहेत त्यात साईड रोल करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी पसंत केलं आहे. ओटीटी माध्यमाची ताकद मोठी आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.

Hansal Mehta and abhishek bachchan news
हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत

मी जेव्हा स्कॅम 1992 तयार केला त्यावेळी माझ्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना होत्या. दुसरं म्हणजे मला अनेकांनी या चित्रपटामध्ये तुम्ही अभिषेकला का घेतले नाही असा प्रश्न विचारला होता. पण मला त्या लोकांना सांगायचे आहे की, तो जर त्या मालिकेत असता तर ती चालली नसती. माझ्या मालिकेचं यश हे त्या मालिकेचं नाविन्य आणि नवा चेहरा यात आहे हे मला सांगावेसे वाटते. असे मेहता यांनी सांगितले.

Hansal Mehta and abhishek bachchan news
Viral Video: शिल्पाला असं कधी पाहिलयं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com