
‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर (Shashikala Patankar) यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सीरिजची (Web Series) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली या वेब सीरिजची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड आणि संजय गुप्ता सांभाळणार आहेत.
चित्रपट व्यवसायातील सुमारे दोन दशकांच्या आपल्या प्रवासात, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक समित कक्कड यांनी पडद्यामागे स्थिरावत दिग्दर्शकाच्या रूपात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. 'आश्चर्यचकित', 'हाफ तिकीट', 'आयना का बायना' या चित्रपटांसोबतच 'इंदोरी इश्क' हा वेब शो आणि सध्या निर्मिती प्रक्रियेत असलेल्या 'धारावी बँक'मध्ये समित यांचं मुंबईवरील प्रेम हा कॉमन फॅक्टर पहायला मिळतो. वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवरील बायोपिकचं दिग्दर्शनही समित करत आहेत.
मुंबई शहराच्या प्रेमात असलेले समित म्हणाले की, "हे थोडंसं विचित्र वाटलं तरी मी किशोरवयीन असल्यापासून अनपेक्षितपणे यासारख्या विषयांकडे आकर्षित झालो होतो, तेव्हा मी कॉलेजमध्येही नव्हतो. तेव्हाही बार डान्सर्स, गुंड, पानवाले... प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टोरी होती जी तुमचे अनुभव समृद्ध करत असते. मुंबई शहराच्या या अंतरंगाने मला नेहमीच आकर्षित केलं आहे. आजही या कथा जणू सोन्याची खाण आहेत. आपल्याला फक्त आपले कान उघडे आणि पाय जमिनीवर ठेवावे लागतत. मी बऱ्याच वर्षांपासून बार डान्सर्स, गँगलीडर्स यांसारख्या समाजातील घटकांना फॉलो करत होतो. त्यामुळं जेव्हा मी माझं स्वतःचं कंटेंट तयार करू लागलो, तेव्हा माझ्या गाठीशी जमा झालेल्या अनुभवांना आपोआप वाचा फुटणं स्वाभाविक होतं."
‘इथे तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तिरेखा तुमची विचारसरणी कायमची बदलणारी ठरतील. वरवर पाहता खूपच झगमगाट दिसणाऱ्या या शहराच्या अंधाऱ्या वास्तवाने माझ्या मनात कुतूहल जागवलं. माझ्या आशयातील सर्व व्यक्तिरेखा, सेटिंग्ज आणि चित्रण वास्तविक अनुभवातून आलेलं आहे,' असं ते म्हणाले स्वीटीच्या जीवनावर आधारित असलेली पुष्कराज आणि शशिकला पाटणकर यांच्या जीवनावरील कथा हे दोन्ही आकर्षक असून, प्रेक्षकांना त्यांनी यापूर्वी न पाहिलेले या शहराचे पैलू दाखवणाऱ्या ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.