What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...
What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...Google

KBC Facts: नाकापेक्षा मोती जड,अमिताभच्या कपड्यांचा खर्च ऐकून फिरतील डोळे

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती १४' हा नवा सिझन लवकरच सुरु होत आहे.

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या 'कौन बनेगा करोडपती १४'(Kaun Banega Crorepati 14) चा नवा सिझन(New Season) लवकरच सुरु होत आहे. अमिताभ यांनी केबीसी १४ चं शूटिंग देखील सुरु केलं आहे. नवा सिझन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाशी अगदी पहिल्या सिझनपासून जोडले गेले आहेत. त्यांनी या शो चे १३ सिझन होस्ट केले आहेत. केवळ तिसरा सिझन शाहरुख खानने होस्ट केला होता. जेव्हा कधी प्रेक्षक 'कौन बनेगा करोडपती' पाहतात तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न उठतो आणि तो म्हणजे की अमिताभ व्यतिरिक्त या शो कधी कुणी होस्ट करु शकेल? (What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...)

What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...
Kapil Sharma Show: नवा सिझन,नवे कलाकार,जुन्यांची एक्झिट? काय हे भानगड?

अमिताभ यांनी तब्बल १३ सिझन आपल्या खुमासदार निवेदनानं या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कितीतरी लोकांना लखपति आणि करोडपती बनवलं आहे. पण या शो संदर्भात कितीतरी अशा गोष्टी आहेत त्या चाहत्यांना माहीत नसतील. प्रत्येक एपिसोडला अमिताभ यांच्या कपड्यांवर किती खर्च केला जातो? विनर्सला जिंकलेल्या रकमेपैकी नेमके किती पैसे मिळतात? केबीसी मध्ये प्रेक्षक म्हणून जे जातात त्यांना पैसे मिळतात का? शो मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी कशी केली जाते? चला जाणून घेऊया याविषयीची माहिती.

'कौन बनेगा करोडपती' च्या प्रत्येक एपिसोडला होस्ट करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर लाखो रुपये खर्च केले जातात. मिळालेल्या वृत्तानुसार,एका एपिसोडसाठी अमिताभ यांच्या कपड्यांवर जवळ-जवळ १० लाख रुपये खर्च केला जातो. प्रत्येक एपिसोडमध्ये अमिताभ सूट-बूट,टाई,ब्रोच,पिन,स्कार्फ सोबत परफेक्ट लूकमध्ये नजरेस पडतात. त्यांच्या या वॉर्डरोबसाठी जे काही मटेरियल लागतं ते विदेशातून मागवलं जातं अशी बातमी आहे. १३ व्या सिझनसाठी स्टायलिस्ट प्रिया पाटीलने अमिताभ बच्चन यांचे कपडे डिझाईन केले होते. यावेळी त्यांचा स्टायलिस्ट कोण असेल हे अद्याप समोर आलेलं नाही.

What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...
धक्कादायक! अभिनेत्री नीतू चंद्राला 'सॅलरीड वाईफ' बनण्याची बिझनेसमनची ऑफर

तुम्हाला माहित आहे का,'कौन बनेगा करोडपती' मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी नेमकं कोण करतं?

त्यासाठी एक्सपर्ट लोकांचे पॅनल असते,ज्यांची निवड शो च्या निर्मात्यांनी केलेली आहे. या मध्ये निर्माते सिद्धार्थ बसू देखील सामिल आहेत. सिद्धार्थ बसू केवळ निर्माते नाहीत तर क्विज मास्टर देखील आहेत. सिद्धार्थ बसू टीमसोबत बसून वेगवेगळ्या पॅरामीटर्सना लक्षात घेऊन प्रश्न तयार करतात. हे प्रश्न वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असतात. यामध्ये Indian Culture and Mythology, Games and Sports, Current Affairs, News and Events यांचा समावेश असतो. स्पर्धकांच्या आवडी-निवडीला लक्षात घेऊनही प्रश्नांचा समावेश केला जातो.

What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...
'माझा त्यांनी मानसिक छळ केला', 'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतचा खळबळजनक आरोप

अमिताभ यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहित असते का?

तर,खूप लोकांना वाटतं की 'कौन बनेगा करोडपती' विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अमिताभ बच्चन यांच्या जवळ असतात. आपल्या हे लक्षातही येईल कदाचित की अमिताभ अनेकदा स्पर्धकांना प्रश्न विचारल्यानंतर म्हणतातही की माझ्याकडे पाहू नका. मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. अमिताभ बच्चन प्रत्येक एपिसोडपूर्वी चांगला होमवर्क करतात आणि रिहर्सल देखील. ते शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाविषयी माहिती करुन घेतात,म्हणजे त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं सोपं होईल.

What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...
'२४ इंचाची कंबर अन् ३६ इंचाची छाती', काजोलचा बॉलीवूडला चिमटा

जिंकणाऱ्या स्पर्धकाला सगळे पैसे मिळतात का?

हा देखील प्रश्न नेहमी उठतोच सगळ्यांच्या मनात. आपण पाहिलं असेल की जिंकल्यानंतर अमिताभ साइन करुन एक चेक स्पर्धकाला देतात. अमिताभ लगेच ते पैस स्पर्धकाच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करतात. पण हे खरं नाहीय. जिंकलेल्या रकमेतून ३० टक्के टॅक्स कट होतो. आणि त्यानंतर पैसे स्पर्धकाला दिले जातात. जर एका स्पर्धकानं १ कोटी जिंकले असतील तर टॅक्स कट होऊन त्याला फक्त ७० लाख मिळतात. केबीसी ला पैसे त्यांच्या स्पॉन्सर्सकडून मिळतात त्या व्यतिरिक्त RBI कडूनही मिळतात,जो त्यांचा स्पेशल पार्टनर आहे. माहितीनुसार,केबीसी ला भारतीय रिझर्व बॅंकेकडून ४०० करोडचा फंड मिळतो.

What are some hidden facts about Kaun Banega Crorepati? Amitabh Wardrobe etc...
Koffee WIth Karan7:'गोव्यात त्या रात्री..', सारा-जान्हवीचा कशाविषयी खुलासा?

'फास्टेट फिंगर फर्स्ट' नंतर लगेच ब्रेक का येतो तर या राउंड मध्ये जो विनर बनतो,त्याचा पहिला मेकअप केला जातो. आणि नंतर त्याला हॉट सीटवर बसवून शो पुढे नेला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com