"फलक मराठीत लिहून अस्मिता जपली जात नाही, याने काय होणार?"

जो "मराठी" आहे त्याला किंमत आहे का भाषेची - सुमित राघवन
"फलक मराठीत लिहून अस्मिता जपली जात नाही, याने काय होणार?"
Summary

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. राज्यसरकारच्या या निर्णयावरअभिनेता सुमित राघवन याने दुकानाची नावे मराठीत लिहून काय होणार असा प्रश्न उपस्थित करत कृपा करून मोठा विचार करा, अशी विनंती केली आहे.

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. राज्यसरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. यावर अभिनेता सुमित राघवन याने दुकानाची नावे मराठीत लिहून काय होणार असा प्रश्न उपस्थित करत कृपा करून मोठा विचार करा, अशी विनंती केली आहे.

सुमित राघवनने मंत्री सुभाष देसाई यांचा महाराष्ट्रातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ रिट्वीट करत आपल्या भावना केल्या. सुमित राघवनने ट्वीटद्वारे म्हणाला, “याने काही मदत होणार का? तर अजिबात नाही. मराठी भाषेला प्रोत्साहन द्यायचे असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखा आहे,”

सोबत पुढे दुसऱ्या ट्वीटमध्ये सुमित राघवन म्हणतो, "मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं?"असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचे. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड,फलक मराठीत लिहून "मराठी अस्मिता" जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय"

जो "मराठी" आहे त्याला किंमत आहे का भाषेची, असा सवाल करीत सुमित पुढे एका ट्वीटमध्ये म्हणतो, "मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिश बद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो "मराठी" आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची?"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com