भेटवस्तूंचा वर्षाव करणाऱ्या राजला शिल्पाने 'या' कारणासाठी दिला होता नकार

शिल्पाचं सामान परत करण्यासाठी राज चक्क लंडनहून मुंबईला आला होता.
Shilpa Shetty and Raj Kundra
Shilpa Shetty and Raj KundraInstagram

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty आज ४६वा वाढदिवस. शिल्पाने राज कुंद्राशी Raj Kundra लग्न केलं असून या दोघांना वियान आणि समिशा ही दोन मुलं आहेत. शिल्पा-राजच्या लग्नाला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिल्पा नेहमीच पती राजसोबतचे मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. पण या दोघांची लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का? शिल्पाचं हृदय जिंकण्यासाठी राजने सुरुवातीला बरेच प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी शिल्पाने त्याला स्पष्ट सांगून टाकलं होतं की, "आपल्यात काहीच होऊ शकत नाही." (When Raj Kundra showered Shilpa Shetty with gifts but she told nothing could happen between them)

२०१८ मध्ये 'एशियन एज'ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, "राजकडे माझं काही सामान राहिलं होतं आणि ते मला परत देण्यासाठी तो चक्क लंडनहून मुंबईला आला होता. पहिल्या दिवशी त्याने मला रंगीत बॅग दिली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी बॅग भेट म्हणून दिली. भेटवस्तूंमागचं संकेत समजताच मी त्याला लगेच फोन करून सांगितलं की, आपल्या दोघांमध्ये भविष्यात काहीच होऊ शकत नाही. कारण त्यावेळी मला मुंबई सोडून लंडनमध्ये शिफ्ट व्हायचं नव्हतं."

Shilpa Shetty and Raj Kundra
‘कोरोना प्यार हैं…’; शिल्पा-राजचा रोमॅंटिक फोटो व्हायरल

पहिल्या डेटविषयी सांगताना शिल्पा पुढे म्हणाली, "जेव्हा मी लग्नाचा विचार करत होते, तेव्हा त्यानेसुद्धा मला स्पष्ट सांगितलं की तोसुद्धा लग्नाचा विचार करत आहे. मुंबईतील त्याच्या घराचा पत्ता त्याने मला दिला आणि भेटायला बोलावलं. हीच आमची पहिली भेट होती, असं मी म्हणेन."

राज आणि शिल्पा २००९ मध्ये विवाहबंधनात अडकले. २०१२ मध्ये शिल्पाने वियान या मुलाला जन्म दिला. दुसऱ्या बाळासाठी राज आणि शिल्पाने सरोगसीची मदत घेतली. त्यांना सरोगसीद्वारे समिशा ही मुलगी झाली. काही दिवसांपूर्वीच शिल्पाचा पती राज आणि कुटुंबीय कोव्हिड पॉझिटिव्ह होते. सर्व कुटुंबीयांमध्ये फक्त शिल्पाच कोव्हिड निगेटिव्ह होती. यावेळी शिल्पाने तिच्या टीव्ही शोमधून ब्रेक घेत सर्वांची काळजी घेतली. शिल्पा लवकरच 'हंगामा' या कॉमेडी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात भूमिका साकारणार आहे.

Shilpa Shetty and Raj Kundra
अशोक सराफ यांना सायली संजीव का म्हणते 'पप्पा'?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com