Tabu Birthday: जेव्हा तब्बूने निम्म्या वयाच्या मुलासोबत इंटीमेट सीन दिला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tabu Birthday

Tabu Birthday: जेव्हा तब्बूने निम्म्या वयाच्या मुलासोबत इंटीमेट सीन दिला...

तब्बू बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलयं. तब्बू आज तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमधील मुस्लिम कुटुंबात झाला.

हेही वाचा: तब्बू म्हणतेय अजयमुळे मी अजूनही सिंगल!

90 च्या दशकापासून ही अभिनेत्री आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. तब्बू तिच्या चित्रपटांमध्ये वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर तिने केलेल्या काही अभिनयामुळेही ती चर्चेत आली. तिची अशीच एक भूमिका फार गाजली, ज्यात ती तिच्या निम्म्या वयाच्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसली.

tabu kissing scene

tabu kissing scene

तब्बू ही ईशान खट्टरसोबत 'ए सुटेबल बॉय'मध्ये दिसली होती. या वेब सीरिजमध्ये तब्बू आणि इशान यांच्यामध्ये एक रोमॅंटिक सीन दाखवण्यात आला होता. ज्यात दोघं किस करतांनाही दिसले होते. दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत असलेल्या या किसिंग सीनमुळे इशान विशेष चर्चेत आला तर निम्म्या वयाच्या मूलासोबत रोमांस केल्यामुळे तब्बूला चांगलच ट्रोल करण्यात आलं होत.तब्बू इशानपेक्षा वयाने जवळपास दुप्पट मोठी आहे .त्यामूळे अर्ध्या वयाच्या इशानसोबत तब्बू ऑनस्क्रीन किसिंग सीनची चर्चा रंगली होती.

हेही वाचा: Tabu Birthday: तब्बूची आहे एवढ्या कोटींची प्रॉपर्टी! खऱ्या आयुष्यतही जगतेय राणीसारखी...

'ए सुटेबल बॉय' या वेबसीरिज होती जी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. यामध्ये तब्बू वेश्याच्या भूमिकेत होती. मीरा नायर दिग्दर्शित 'अ सुटेबल बॉय' या वेबसिरीजमध्ये तब्बू, ईशान खट्टर, रसिका दुग्गल, राम कपूर, नमिता दास, विजय वर्मा, रणवीर शौरी आणि रणदीप हुडा यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. या वेब सिरिजमध्ये उत्तर प्रदेश आणि कोलकाता 1950 च्या आसपासचा काळ दाखवण्यात आला आहे. ही वेब सिरीज विक्रम सेठ यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

हेही वाचा: Tabu : 'भोला'च्या सेटवर तब्बुला अपघात, स्टंट करताना दुखापत

तिच्या 20 मे 2022 रोजी रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटात लोकांनी तिला खूप पसंत केले. या चित्रपटाशिवाय आता तब्बू लवकरच 'कुत्ते' ‘खुफिया’, ‘दृश्यम 2’ आणि ‘भोला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.