अंकिता लोखंडेच्या लग्नाचा अमृता खानविलकरला बसला मोठा फटका....

सोशल मीडियावर हटके स्टाईलमध्ये व्हिडीओ पोस्ट करून दिली माहिती
Amruta Khanvilkar,Ankita Lokhande
Amruta Khanvilkar,Ankita LokhandeGoogle

'आता वाजले की बारा' म्हणत भल्या-भल्यांना थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणजे मराठी इंडस्ट्रीतली बबली गर्ल. अमृतानं स्वतःला मराठी इंडस्ट्रीपुरतं मर्यादित नं ठेवता हिंदीतही आपलं प्रस्थ ब-यापैकी निर्माण केलं. 'राझी' या सिनेमात आलिया भट्टसोबत असूनही तिनं आपल्याकडेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. 'नच बलिये' या हिंदी डान्सिंग शो ची विनर झाल्यानंतर तर तिनं हिंदी सिनेमांकडे आपला कल थोडा वेगानं वळवला. अर्थात त्याचं एक कारण म्हणजे हिंदी टेलीव्हिजनमध्ये काम करणारा तिचा नवरा हिमांशु मल्होत्रा आणि अंकिता लोखंडेसारख्या हिंदीतल्या स्टार कलाकारांसोबतची तिची मैत्री. अंकिताच्या लग्नाच्या तर प्रत्येक विधीसोहळ्यात तिनं आवर्जुन उपस्थिती लावली होती.

बरं सांगायचा मुद्दा हा की आता अंकिता लोखंडेच्या हळदीला जाणं अमृताला फारच महागात पडलंय. अंकिताच्या हळदीसाठी अमृतानं तिची पिवळ्या रंगाची एक फेव्हेरट साडी नेसली होती. त्यावर लाल रंगाचा तिनं घातलेला ब्लाऊज परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करीत होता. अमृता ही या यलो-रेड कॉम्बिनेशनमध्ये खुप सुंदर दिसत होती. आता हळदीला गेलो म्हणजे आपल्यालाही हळद लागणार हे अमृताच्या खूप उशिरा लक्षात आलं आणि मग हळदी समारंभात सामिल होण्यासाठी जावं की नको यावरनं ती अडून बसली. पण आता एवढं नटून आलोय मैत्रिणीच्या लग्नाला तर त्यात सहभागी कसं नाही व्हायचं. मग अमृता बाईंनी शेवटी आपल्या फेव्हरेट साडीला श्रद्दांजली द्यायचं ठरवलं आणि ती ही हटके स्टाईलने दिली बरं का.

Amruta Khanvilkar,Ankita Lokhande
हरनाज संधू म्हणाली,''बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री माझं प्रेरणास्थान''

अमृताने काय केलं असेल तर तिने सारा अली खानच्या 'अंतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाण्यावर डान्स करीत आपल्या साडीला शेवटचा गुडबाय केला. तिनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत त्याला कॅप्शन दिलंय की, ''जेव्हा तुमच्या फेव्हरेट सा़डीला गुडबाय बोलायचे असते तेव्हा असा डान्स सुचतो कारण आज हळद आहे मैत्रिणीची''. आणि तिच्या या व्हिडीओला अभिनेत्री अभिज्ञा भावे ने कमेंट करीत लिहीलंय,''वा मैत्रिणी, आम्ही तुझी खाली वाट पाहतोय आणि तू व्हिडीओ करीत बसलीयस,खाली ये लवकर''. आता यामुळे अंकिताचं लग्ना अमृताला मात्र नुकसान करवून गेलं एवढं मात्र नक्की. पण आनंदापुढे सगळंच फेल,मग साडी काय चीज असं बहुधा अमृतानं स्वत:ला समजावलं असावं. अंकिता लोखंडे आणि विकी जैन आज लग्नबंधनात अडकले. हिंदी टि.व्ही इंडस्ट्रीतील अनेकांनी या लग्नाला हजेरी लावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com