'भारतीयांसाठी कोरोना लस उपलब्ध का नाही?'; अभिनेत्रीचा उद्धव ठाकरेंना सवाल

स्वाती वेमूल
Wednesday, 17 February 2021

कोविड-१९ प्रतिबंधक लस बनवणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे.

कोविड-१९ प्रतिबंधक लस बनवणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. एकीकडे भारतात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असतानाच इतर देशांनाही सीरमच्या कोविशिल्ड लशींचा पुरवठा भारताकडून करण्यात येत आहे. भारतानं श्रीलंका, भूतान आणि मालदीव या शेजारील देशांसह मोरोक्को, ओमान, अल्जेरिया या आफ्रिकन देशांनाही लस पाठवली आहे. देशात कोरोना लशींचा पुरेसा पुरवठा असताना आणि इतर देशांनाही लस निर्यात होत असताना, भारतीयांना खरेदीसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध का होऊ शकत नाही, असा सवाल अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी केला आहे. 

'जेव्हा आपल्याला माहितीये की कोविशिल्ड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कॅनडा आणि इतर देशांमध्ये तो निर्यात केला जातोय, तर मग भारतीय नागरिकांना खरेदीसाठी लस उपलब्ध का केली जात नाहीये,' असा प्रश्न त्यांनी ट्विट करत विचारला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आदर पूनावाला यांना टॅग केलंय. 

हेही वाचा : कंगनाच्या सुरक्षेसाठी किती पैसा खर्च होतो? 

हेही वाचा : करीनाला पुत्ररत्न? सैफच्या बहिणीच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा

आता कुठे देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. येत्या काळात लशीचा तुटवडा जाणवण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी भारताने शेजार धर्माचे पालन करत मित्र राष्ट्रांना लशींचा पुरवठा सुरू केला आहे. भारताकडून लशींची मदत मिळवणारा भूतान पहिला देश ठरला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why covishield is not released on the market for Indian citizens asks simi garewal to uddhav thackeray