आमिरच्या मुलाची बॉलीवूड एन्ट्री; बाप-लेक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार Amir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amir Khan And his son Junaid khan work together in web series

आमिरच्या मुलाची बॉलीवूड एन्ट्री; बाप-लेक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची(Amir Khan) मुलगी आयरा खान(Ira Khan) नेहमीच चर्चेत पहायला मिळते पण मुलगा जुनैद खान(Junaid Khan) मात्र आजपर्यंत लाइमलाइट पासून दूर राहिलेला दिसून आलं आहे. पण आता आमिरच्या या मुलाविषयी मोठी बातमी समोर आली आहे. जुनैदला कॅमेऱ्यासमोर नाही तर कॅमेऱ्यामागे रमायला आवडतं असं अनेकदा आमिरनं म्हटलं होतं. पण आता तो कॅमेऱ्यासमोर दिसमार असल्याची चर्चा आहे. जुनैदच्या 'प्रीतम प्यारे' या वेब सीरिजमध्ये आमिरनं खास कॅमियो शूट केलं आहे. चाहते मात्र भारी खूश आहेत की आता या वेब सीरिजच्या निमित्तानं बाप-लेकाची जोडी पडद्यावर पहायला मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की,जुनैद खान लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. तो 'महाराज' या सिनेमातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करीत आहे.

हेही वाचा: कंगनाचं महेश बाबूला समर्थन; म्हणाली,'हे खरंय,तो बॉलीवूडला परवडणार नाही'

आमिर खान सध्या 'लाल सिंग चड्ढा' या आपल्या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. पण यातनं वेळ काढत त्यानं आपल्या होम प्रॉडक्शन अंतर्गत बनणाऱ्या 'प्रीतम प्यारे' सीरिजसाठी कॅमियो शूटिंग केलं. याच सीरिजमध्ये आमिरचा मुलगा जुनैद खानही दिसणार आहे.

हेही वाचा: 'बलात्कार एक सरप्राइज सेक्स'; सनीला हे खळबळजनक ट्वीट करणं पडलं होतं महाग

आमिरने १ मे रोजी जुनैद आणि टीमला या सीरिजच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये जॉइन केलं होतं. तिथे एका आठवड्यात त्यानं सीरिजमधील एक गाणं आणि काही हॉस्पिटलमधील सीनचं शूटिंग केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे की,आमिर,जुनैद आणि सह-कलाकार संजय मिश्रानं नवलगढ जवळील ग्रॅंड हवेली आणि रिसॉर्टमध्ये हे शूटिंग केलं आहे. तर काही सीन्स कूलवाल कोठी होटलमध्ये देखील शूट केले गेले आहेत.

हेही वाचा: 'त्यादिवशी माझा वाढदिवस होता,अख्खं ठाणं जळत होतं'; हेमांगीची पोस्ट चर्चेत

आमिर खानचा मुलगा जुनैद बद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे आता या सीरिज व्यतिरिक्त 'महाराजा' नावाचा सिनेमा देखील आहे. ज्या सिनेमातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. जुनैद त्या स्टार किड्समधील एक आहे जो लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. तो आपल्या प्रसिद्धिपेक्षा जास्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

हेही वाचा: 'उर्मिला आणि माझ्यात...'; बिनसलेल्या नात्यावर काय म्हणाला आदिनाथ कोठारे?

आमिर खान जसं आम्ही वर म्हटलं तसं सध्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात व्यस्त आहे. त्याचा हा सिनेमा 'Forrest Gump' या सिनेमाचं हिंदी अॅडॅप्टेशन आहे. 'फॉरेस्ट गम्प 'सिनेमात टॉम हॅंक्स मुख्य भूमिकेत होता. 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात आमिर खान सोबत करिना कपूर-खान,नागाचैतन्य आणि मोना सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून आमिर खूप दिवसानंतर पडद्यावर त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट,२०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Amir Khan And His Son Junaid Khan Work Together In Web

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top