Shah Rukh Khan Kiss Video: शाहरुखला पाहून 'तिच' सुटलं भान! किसींग व्हिडिओ व्हायरल

Woman kisses Shah Rukh Khan at Dubai event fans  upset video viral
Woman kisses Shah Rukh Khan at Dubai event fans upset video viral Esakal

Shah Rukh Khan Kiss Video: भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार शाहरुख खान अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतो. शाहरूख यशराज फिल्म्सच्या 'पठाण' चित्रपटातून तब्बल चार वर्षानंतर सिल्व्हर स्क्रीनवर कमबॅक केल आणि पुन्हा तो बादशाह असल्याच सिद्ध केलं.

शाहरुख खानला किंग खान बोलण्यामागे एक मोठं कारण आहेत ते त्याचे चाहते. त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्याचे चाहते शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. त्याचा बंगला मन्नत बाहेर मोठी गर्दीही जमते.

बॉलिवूडच्या रोमांसचा बादशाह असं ही त्याला म्हटलं जात. महिलांमध्ये त्याचे वेगळे आकर्षण आहे. शाहरुखच्या महिला चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे. त्याचे चाहते त्याच्यासाठी किती वेडे आहेत हे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून कळेतच.

अलीकडेच शाहरुख खान दुबईतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता, जिथे त्याने मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडची जाहिरात केली होती.

Woman kisses Shah Rukh Khan at Dubai event fans  upset video viral
Sushant Singh Rajput Death Anniversary: भावाच्या आठवणीत सुशांतची बहिण व्याकूळ तर रियाला पोस्ट करणं पडलं महागात! पोस्ट व्हायरल

त्या कार्यक्रमात शाहरुखला पाहिल्यानंतर चाहते वेडेच झाले. सर्वच त्याला भेटण्यासाठी उत्सूक होते. त्यातच किंग खानला समोर पाहून एका महिला चाहती इतकी उत्सूक झाली की तिने त्याला थेट किसच केले. ती हस्तांदोलन करायला आली, पण चुंबन घेतलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि अंगरक्षक दिसत आहे. आधी त्याच्या एका चाहत्याने हस्तांदोलन केले आणि नंतर त्याच्या हाताचे चुंबन घेतले. यानंतर ती महिला आली आणि शाहरुखला विचारते की मी तुला किस करु का आणि शाहरुखनं काही उत्तर देण्याआधीच तिनं शाहरुखच्या गालावर एक जोरदार किस केल.

Woman kisses Shah Rukh Khan at Dubai event fans  upset video viral
Gautami Patil: धन्य ती माऊली! गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video व्हायरल..

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. शाहरुख खानने पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटातून पुनरागमन केले. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला.

सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com