Yash: बिग बी आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत 'केजीएफ' फेम यशची वर्णी...KGF Chapter2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yash, KGF Chapter 2 Star...compare with Amitabh, Rajinikanth

Yash: बिग बी आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत 'केजीएफ' फेम यशची वर्णी...

Yash: रॉकिंग स्टार यश हा केवळ स्टार नसून एक आयकॉन आहे. एक आयकॉन ज्याने आपल्या जबरदस्त आकर्षणाने देशाला वेड लावून बॉक्स ऑफिसवर विक्रम केला. 'केजीएफ २' (KGF 2)ला मिळालेल्या उदंड यशाने सिद्ध होते की यश हा एक असा सुपरस्टार आहे जो इंडस्ट्रीला दशकातून एकदा भेटतो. यश आज मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या लीगमध्ये उभा आहे, ज्यांनी त्यांच्या शैली आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वाने अनेक दशके राज्य केले.(Yash, KGF Chapter 2 Star...compare with Amitabh, Rajinikanth)

हेही वाचा: Lalit Prabhakar: 'मुलगी शिकली प्रगती झाली, जास्त शिकली...', ललित प्रभाकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

'केजीएफ'(KGF) मध्ये रॉकी भाईच्या भूमिकेत यशने पडद्यावर जो आवेश आणला तो खरोखरच पाहण्यासारखा आहे. त्याच्या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेची अनेक उदाहरणे असून, लोक त्याच्या शैलीची हुबेहूब नकल करतात. ही क्रेझ ७० च्या दशकात पाहायला मिळायची जेव्हा अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी आपल्या आयकॉनिक स्टाइलने देशावर राज्य केले. यशच्या रॉकी भाईच्या पात्राबाबतही असेच काहीसे पाहायला मिळते.

हेही वाचा: Lalit Prabhakar: 'एकटेपणातच सुख...', ललित प्रभाकर स्पष्टच बोलला

एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्याला विचारले की, 'रॉकी भाई साठी रजनीकांतच्या मॅच स्टिकची शैली किंवा जंजीरमधील अमिताभ बच्चनच्या धमाकेदार डिलिव्हरीची आठवण करून देणारे आयकॉनिक संवाद तयार करणे आवश्यक आहे का?', यावर यशने उत्तर दिले,"मला वाटतं कि तुम्ही बघितलं तर पाश्चात्य चित्रपट, ज्यांना हिंसक चित्रपट समजले जात होते, त्यावेळी कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही. आज ते त्याच्या शैलीमुळे क्लासिक मानले जातात, तसेच लोकांनी त्यांची शैली कॉपी केली. मुख्य पात्र स्क्रीनवर एक विशिष्ट आकर्षण आणि व्यक्तिमत्व आणते ज्याचे लोक अनुसरण करतात. माझ्या मते त्या पिढीसाठी ते आवश्यक आहे. आपण एक प्रकारचे स्टाईल आयकॉन किंवा एखाद्या गोष्टीचे अँबॅसेडर बनतो''.

हेही वाचा: Alia Bhatt: आलियाच्या मुलीला पाहून महेश भट्टना आठवली पूजा भट्ट; म्हणाले...

तुम्हाला त्या गोष्टींसाठी अभिनेत्यांची गरज असते आणि जर लोक त्याच्याशी जोडले गेले, तर ते शैली किंवा व्यक्तिमत्त्वामुळे एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होतात. त्यामुळे, हे महत्त्वाचे आहे, जेव्हा तुम्ही पडद्यावर येता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्वही बाहेर आले पाहिजे. जर एखादा दिग्दर्शक स्क्रिप्ट घेऊन येतो, तर ती एक चांगली स्क्रिप्ट किंवा त्यांची लिहिण्याची पद्धत नसते, त्यापेक्षा एक अभिनेता म्हणून तुम्ही पडद्यावर जे सादर करता ते तुम्हाला पुढे घेऊन जाईल, मला खात्री आहे."

हेही वाचा: Alia Bhatt: डिलीव्हरीनंतर आलिया भट्टचा 'तो' व्हिडीओ व्हायरल,लोक म्हणू लागलेयत...

शिवाय, यशची कथा ही खरोखरच प्रेक्षकांशी एक वेगळ्या पद्धतीनं कनेक्ट होते. तो एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे, त्याचे वडील बस चालक होते. यशने मेहनत करून खूप मोठा प्रवास केला आहे आणि तो देशासाठी एक प्रेरणा देणारा आहे. यश हा देशाचा आवडता अभिनेता म्हणून उदयास आलाअसून, निःसंशयपणे 'केजीएफ २'(KGF 2) च्या उत्कृष्ट यशामागे हे एक मोठे कारण आहे.