‘येरे येरे पावसा’ची टोकियो इंडी फिल्म महोत्सवात बाजी ; दोन पुरस्कार आणि सात नामांकने

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 1 October 2020

पावसाची धमाल आणि लहानांची कमाल याची प्रचिती देणारे प्रभावी प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर निरनिराळया मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या चित्रपटाच्या माध्यमातुन दाखवण्यात आले आहे.   नुकत्याच झालेल्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना या विभागांसाठी नामांकन मिळालं होतं.

मुंबई -‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची निर्मिती असलेल्या आणि शफक खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘येरे येरे पावसा’ने टोकियो इंडी फिल्म महोत्सवात बाजी मारली आहे. मनाचा ठाव घेणारे कथानक, प्रभावी आशय आणि त्याची तितकीच लक्षवेधी मांडणी, या सा-या वैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट कौतुकास पात्र ठरला आहे.

या चित्रपटाची कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे.  संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. ‘6 व्या Top Indie Film Awards Tokyo ’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘येरे येरे पावसा’ला ७ नामांकने मिळाली होती. त्यापैकी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट छायांकन व ध्वनी या दोन विभागांमध्ये पुरस्कार पटकवत बाजी मारली आहे.सध्या चित्रपटावर कौतुकाचा आणि पुरस्कारांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाला टोकिया इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आलं आहे. 

अभिषेक बच्चनला यूजरने विचारलं, 'ड्रग्स आहेत का?' ज्युनिअर बच्चनने उत्तर देत केली बोलती बंद

 पावसाची धमाल आणि लहानांची कमाल याची प्रचिती देणारे प्रभावी प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर निरनिराळया मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या चित्रपटाच्या माध्यमातुन दाखवण्यात आले आहे.   नुकत्याच झालेल्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना या विभागांसाठी नामांकन मिळालं होतं.  या वर्षात आमच्या चित्रपटाला टोरंटो, कॅनडा आणि आता टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काररुपी पावती मिळाल्याने आम्ही सुद्धा या आनंदात चिंब झालो आहोत, अशी भावना दिग्दर्शक शफक खान यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचा - ऐश्वर्याला जेव्हा विचारलं गेलं, १० लाख डॉलर मिळाले तर काय करशील? 'हे' होतं विश्वसुंदरीचं उत्तर

पहिल्या पावसाचा आनंद काही औरच असतो. त्या पावसाच्या अनेक आठवणी मनात घर करुन असतात. पावसाची एखादी सर अंगावर आली की,  प्रत्येक जण सुखावून आणि मोहरुन जातो. अनेक लहान मुलांच्या ओठी ‘येरे येरे पावसा,तुला देतो पैसा’ हे बालगीतही ऐकू येतं. पावसाची अनेक रुपं आहेत. कधी तो लहान मुलांच्या होड्या वाहून नेणारा खोडकर असतो, तर कधी गडगडाट करुन प्रत्येकाला घाबरवून सोडणारा बेताल असतो. त्यामुळे प्रत्येकासाठी पावसाची संकल्पना वेगवगेळी आहे. याच पावसावर आधारित ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट  आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yere Yere Pavasa Won Award Tokyo Indy Film Festival 2020