
Zakir Khan : झाकीर खान सर्वात लोकप्रिय स्टँडअप काॅमेडियन (Comedian), शायरपैकी एक आहे. तसेच मोटिव्हेशनल स्पीकरही आहे. मात्र तसा दावा ते करत नाही. त्यांचे जीवन संघर्ष लोकांना प्रेरित करत असतो. झाकीर खान तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांचे लोकप्रिय व्हिडिओ व्हेन आय मीट देल्ही गर्ल (When I meet Delhi girl) आणि भाई तुम्हारा सुपरमॅन ( Bhai Tamara Superman) यासह त्यांचे इतर व्हिडिओ हास्य आणि शायरी आदीची प्रतिभा दाखवते.
अपशब्द न वापरता त्यांचे संवाद कौशल्य आणि गोष्ट सांगण्याची कसबामुळे ते सर्व वयोगटात लोकप्रिय आहेत. झाकीर खान (Zakir Khan) यांचा जन्म आणि संगोपन इंदूरमध्ये झाले होते. त्यांनी सितारमध्ये डिप्लोमा केला आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले. झाकीर यांचे वडील इस्माइल खान पूर्वी तबला वादन करत आणि आई कुलसूम खान एक गृहिणी होती. त्यांनी नोकरीसाठी दिल्लीत बराच संघर्ष केला. मात्र दैवाला वेगळच मान्य होतं. (Zakir Khan a comedian who inspire people and do comedy)
ते न केवळ कवी, कलाकार, स्टँडअप काॅमेडियन, तर एक स्वाभिमान, प्रेम, दोस्ती आणि अनेक मूल्यांवर बोलत असतात. त्याची समाजात गरज आहे. चाचा विधायक है हमारे या लोकप्रिय वेब सीरिजचे लेखन झाकीर खान यांनी केले तसेच त्याची निर्मितीही त्यांनीच केली होती. त्यात काॅमेडी असल्याने ती सगळ्यांनाच आवडली.
झाकीर खान उर्फ राॅनी भैय्या तुम्हाला हसवण्यासाठी 'चाचा विधायक है हमारे' चा दुसरा सिझन घेऊन येत आहे. हे सिझन शुक्रवारपासून अॅमेझाॅन प्राइम व्हिडिओवर सुरु होणार आहे. शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गुरुवारी या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने सीझनविषयी झाकीर खानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
मै वक्त और तुम कयामत देखना,
जब हम मिलेंगे तो इस कायनात में सब कुछ रुक जायेगा
वो कौन है भाई
इस बात का सबसे बडा हिस्सा
इस बात का होता है कि
वो कहाँ से आया है
तुम भी कमाल करते हो,
उम्मीदे इन्सान से लगा कर
शिकवे भगवान से करते हो
जितना तेजाब मिला दुनिया से, उसी की शरीब बेचता हूँ,
जिल्लते छतों पर टांग, अस्मा को खाब बेचता हूँ.
बहुत मासूम लडकी है इश्क की बात नहीं समझती न जाने
किस दिन में खोयी रहती, मेरी रात नहीं समझती
हर एक दस्तूर से बेवफाई, मै शिद्दत से है निभाई
रास्ते भी खुद है ढुँढे, और मंजिल भी खूद बनायीं
मै वक्त और तुम कयामत. देखना,
जब हम मिलेंगे तोह इस कायनात में सब कुछ रुक जायेगा
झाकीर खान स्वसन्मानाला (सेल्फ रिस्पेक्ट) तुमच्या प्रेमापेक्षा अधिक अग्रक्रम देण्यास सांगतात. कारण त्यांचे म्हणणे आहे, की कोणाशीही प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करा. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याचा आदर करु लागता. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा स्वतःचा आदर करु लागता. मग कोणीही असो जो तुमचा आदर करत नाही तुम्ही त्याच्याबरोबर राहू शकत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.