
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील जामखेड शिवारातील सोलार पॉवर टाटा कंपनीच्या रोहिलागड हद्दीतील सेक्टर 16 मध्ये शनिवारी (ता.14) रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास केबल वायरची चोरी करणाऱ्या एका साथ वर्षीय संशियतचा सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिदोडा (ता. जि. बीड) येथील संशियत उमराव देवराव काळे (वय 60) वर्षे हे व इतर सहकारी अंबड तालुक्यातील जामखेड शिवारातील सोलार पॉवर टाटा कंपनीच्या रोहिलागड हद्दीतील सेक्टर 16 मध्ये केबल वायर ची चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. तर त्याच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांनी पलायन केले.