औरंगाबादेत कोरोनाचा कहर; ५० तासांत १५जणांचा बळी

14 patients die of Covid-19
14 patients die of Covid-19

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना रौद्र रूप धारण करीत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढली आहे. गेल्या ५० तासांत कोरोनामुळे  १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात शनिवारी (ता.१३) दिवसभरातील आठ बळींचा समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

शहरात शुक्रवारी (ता.१२) दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर शनिवारीही (ता.१३) मृत्यूचे सत्र सुरू होते. दिवसभरात ९१ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांचा बळी गेला. यात चार महिला व चार पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयातर्फे देण्यात आली. 

१३६ वा मृत्यू ः कन्नड येथील ४१ वर्षीय पुरुषाला ११ जून रोजी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १२ जून रोजी रात्री दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. 

१३७ वा मृत्यू ः खोकडपुरा येथील ७८ वर्षीय महिला रुग्णास नऊ जून रोजी रात्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा १० जून रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी (ता.१२) बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

१३८ वा मृत्यू ः कैलासनगर येथील ४३ वर्षीय पुरुषाला २८ मे रोजी घाटीत दाखल केले होते. त्याचा २९ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान आज पहाटे तीनच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

१३९ वा मृत्यू ः रामनगर एन-दोन येथील ७० वर्षीय महिलेला ११ जून रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्या महिलेचा १२ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

१४० वा मृत्यू ः सुभेदारी गेस्टहाऊस येथील ४२ वर्षीय महिलेस १० जून रोजी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ११ जूनला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर शनिवारी (ता.१३) सकाळी साडेसहाला त्यांचा मृत्यू झाला. 

१४१ वा मृत्यू ः रहेमानिया कॉलनी येथील ५० वर्षीय महिलेला सहा जून रोजी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सात जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आज सकाळी ७:५० वाजता या महिलेचा मृत्यू झाला. 

१४२ वा मृत्यू ः संभाजी कॉलनी येथील ५४ वर्षे पुरुषाला ११ जून रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १२ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शनिवारी दुपारी साडेबारा वाजता या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

१४३ वा मृत्यू 
ज्ञानेश्वर नगर, गारखेडा परिसर येथील ७२ वर्षीय पुरुषास शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा १२ जून रोजी रात्री साडे नऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
त्यामुळे आतापर्यंत घाटीत १०९ तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३३, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १४३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com