Coronavirus : पैठणमध्ये २०२ नागरिक होम क्वारंटाइन, वाचा कारण...

 202 People Quarantine At Paithan
202 People Quarantine At Paithan

पैठण (जि. औरंगाबाद) - औरंगाबाद येथील कोरोनाबाधित व्यक्ती येथे असलेल्या त्याच्या नातेवाइकांकडे आली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. सात) प्रशासनाने शहरातील शशिविहार या वसाहतीला सील ठोकले आहे; तसेच या वसाहतीत निवासी असलेल्या ५० कुटुंबांतील 202 व्यक्तींना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे. 

या वसाहतीतील रहिवासी असलेल्या कुटुंबाकडे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात औरंगाबाद येथील व्यक्ती आली होती. ही व्यक्ती कोरोनाबाधित निघाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील रहिवाशांना प्रशासनाने घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, ज्यांच्याकडे कोरोनाबाधित व्यक्ती राहून गेली त्या कुटुंबातील सहा जणांना औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले आहे.

शशिविहार येथे प्रवेशद्वाराजवळ पोलिस उपअधीक्षक गोरक्ष भामरे, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी चोख बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना आता बाहेर पडता येणार नाही. शिवाय या भागात कुणालाही जाता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासन सज्ज असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, सहयोगी प्राध्यापक डॉ. भारत चव्हाण यांनी सांगितले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी तातडीने भेट देऊन अग्निशमन दलाच्या साह्याने वसाहतीतील चार इमारतींत निर्जंतुकीकरण फवारणी केली. 
 
 

या वसाहतीत सरकारी रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने पाहणी केली. या वसाहतीतील कुटुंबातील व्यक्तींना आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून होम क्वारंटाइन केले आहे. कुणालाही कोरोनाची लागण झाली नसून, अद्यापपर्यंत पैठण तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू. 
- डॉ. संदीप रगडे, वैद्यकीय अधिकारी, पैठण
 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाग्रस्त वसाहतींतून ४,८८३ घरांची तपासणी 
औरंगाबाद - कोरोना बाधित असलेल्यांच्या परिसरातील एन-चार, आरेफ कॉलनी, रोषणगेट, जलाल कॉलनी, पद्मपुरा, कासलीवाल मिटमिटा, पेशवेनगर-सातारा, देवळाई-अहबाब कॉलनी आदी परिसर महापालिकेने सील केले आहेत. या वसाहतींतून मंगळवारपर्यंत ४ हजार ८८३ घरांचा सर्वे करण्यात आला. यात पालिकेच्या ७४ पथकांनी एकूण २२ हजार ४७२ नागरिकांची तपासणी केली. पुढील १४ दिवस या घरांचा रोज सर्व्हे करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे.

त्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित नागरिकास थेट घाटी किंवा जिल्हा रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी हलविले जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. आजपर्यंत कोरोना संशयित म्हणून ३९१ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतल्याही माहितीही त्यांनी दिली. त्यापैकी २८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ९३ जणांचे अहवाल अजून वेटिंगवर आहेत. १४ जणांचे अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एक महिला बरी झाली आहे. बाकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत.  

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com