राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी अधिकाऱ्यांना खडसावले; म्हणाले, रखडलेली विकास कामे पूर्ण करा

ईश्वर इंगळे 
Friday, 12 February 2021

शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी होती का, पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहिला का?

सोयगाव (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील रखडलेली विकास कामे प्राधान्याने पूर्ण करा. नवीन विकास कामाचे तात्काळ प्रस्ताव सादर करून शेतकऱ्यांच्या जळालेले रोहित्र (डीपी) वेळेत देण्यासाठी उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तुळजाभवानी मातेचे दर्शन ठरले शेवटचे, पुण्याच्या भाविकाचा तुळजापुरात भोवळ येऊन मृत्यू

श्री.सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१२) सोयगाव येथील बचत भवनमध्ये आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. त्यापूर्वी महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या विविध घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. शासन राबवित असलेल्या घरकुल योजनेचा लाभ गोरगरीब जनतेला मिळवून देण्यासाठी गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी स्वतः लक्ष देऊन पूर्ण कामे करून घेऊन गरिबांना न्याय द्यावा.

स्मार्ट सिटीत तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी, आस्तिककुमार पांडेय यांचा महत्त्वाचा निर्णय

निराधार योजनेच्या पात्र लाभार्त्यांच्या संचिका भरून त्यांना लाभ द्यावा असे सांगत शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी होती का, पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहिला का हे तपासून लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात जाऊन तपासून पाहिले पाहिजे, असे श्री.सत्तार यांनी तंबी दिली. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे चौकशीची मागणी

यावेळी प्रत्येक गावनिहाय नागरिकांच्या समस्या जाणून अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मोनालीताई राठोड, उपजिल्हा प्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, पंचायत समिती सभापती रस्तूलबी पठाण, पंचायत समिती उपसभापती साहेबराव गायकवाड, उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, वनक्षेत्रपाल अजिंठा एस.पी. मंगधरे, वनक्षेत्रपाल सोयगाव राहुल सपकाळ, प्रकल्प अधिकारी डी. पी.बोकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ, शाखा अभियंता लघु ए.जी.कोठावले यांच्यासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.

वाचा ः औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdul Sattar Said, Officers Should Complete Development Works Soygaon Aurangabad Politics