दु्र्दैवच ः रोजगारासाठी महिनापूर्वीच घेतले यंत्र, त्यातच अडकून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

  • अजिंठा-अंधारी प्रकल्पात बुडून तरुणाचा मृत्यू 
  • दोघांवर उपचार सुरू ः शिवनावाडी येथील घटना

चापानेर /शिवना (जि. औरंगाबाद) : अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शिवनावाडी (ता. सिल्लोड) येथे रविवारी (ता. दहा) दुपारी दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, विटा (ता. कन्नड) येथे ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने मका चाऱ्याची कुट्टी करीत असताना यंत्राचा पट्टा तुटून शरीराचे दोन तुकडे झाल्याने एका तरुणाचा जागीच मुत्यू झाला. त्याने महिनाभरापूर्वीच हे यंत्र घेतले होते.

शिवनावाडी शिवारात मनोहर जानकीराम सपकाळ (वय २६), आकाश जानकीराम सपकाळ (२४), रंगनाथ हरिभाऊ सपकाळ (२१) हे तिघे कडब्याची गाडी भरत होते. तापमान जास्त असल्याने काम संपल्यावर थंड पाण्याने हातपाय धुण्यासाठी शेताजवळच असलेल्या अजिंठा-अंधारी प्रकल्पात ते गेले. यावेळी आकाश सपकाळ तोल जाऊन पाण्यात पडला. भावाला वाचविण्यासाठी मनोहरने पाण्यात उडी घेतली. भावाला वाचविण्यात मनोहर यशस्वी झाला; पण तो स्वतः खोलवर जाऊन गाळात फसला.

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली

पाण्यात घसरून पडलेला रंगनाथ सपकाळ गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अजिंठा धरणाच्या जलसाठ्यात उड्या मारल्या; मात्र पोहता येत नसल्याने, पाण्याचा अंदाज न आल्याने मनोहरचा बुडून मृत्यू झाला. शेजारच्यांनी आकाश व रंगनाथ यांना वाचविले.  त्यांना गंभीर अवस्थेत सिल्लोड येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. रंगनाथची प्रकृती स्थिर असून, आकाशची प्रकृती गंभीर आहे. अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर, बीट जमादार रविकिरण भारती, दीपक भंगाळे पुढील तपास करीत आहेत. 

अस्वस्थ वर्तमान 
 
ट्रॅक्टरवरील चाराकुट्टी यंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू 
चापानेर : विटा (ता. कन्नड) येथे ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने मका चाऱ्याची कुट्टी करीत असताना यंत्राचा पट्टा तुटून एका तरुणाला मार लागला. यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याने त्याचा मृत्यू झाला. एकनाथ तुळशीराम भोजणे (वय २२) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 
एकनाथने महिनाभरापूर्वी नवीन टँक्टर वरील चाराचे नवीन कुट्टी मशीन घेतले होते. ट्रॅक्टर घेतल्यापासून रोज चाराची कुट्टी करण्याचे काम सुरू होते. रविवारी विटा येथील कृषी सहाय्यक प्रमोद पुरी यांच्या शेतात मका चाराची कुट्टी करीत असताना अचानक मशीनचा पट्टा तुटल्याने ट्रॅक्टर चालूच असल्याने कुट्टी मशीनचे चाकाचा कंबरेला एवढा चोरात मार लागला काही क्षणातच एकनाथच्या शरीराचे दोन तुकडे झाले. यामुळे त्याचा जागीत मुत्यू झाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of two youths in Aurangabad district