अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार नराधमाने केला अत्याचार, त्याच्याच आईमुळे झाली मुलीची सुटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पीडित मुलीच्या शेजारी राहणारा सिराज नाजिम शेख (19) याने मुलीचा हात पकडून तिला ओढत स्वत:च्या घरात नेले. त्यानंतर अत्याचार करताना मुलीने आरडाओरडा सुरू केला आणि त्याचवेळी तिचा लहान भाऊही रडू लागला. दोघांच्या आवाजामुळे सिराजची आई घटनास्थळावर धावत आली व तिने मुलीची सुटका केली. 

औरंगाबाद : घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीला स्वत:च्या घरात ओढत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शेजाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी ठोठावली. सिराज नाजीम शेख असे त्या नराधम शेजाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पीडित मुलीसह तिच्या लहान भावाच्या रडण्यामुळे धावत आलेल्या सिराज याच्या आईने पीडित मुलीची सुटका केली होती, हे विशेष. 

हेही वाचा - तुमची सत्ता असताना गोट्या खेळत होतात का : इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय 25) फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन सप्टेंबर 2013 रोजी दुपारी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ घरासमोर खेळत होते. त्यावेळी पीडित मुलीच्या शेजारी राहणारा सिराज नाजिम शेख (19) याने मुलीचा हात पकडून तिला ओढत स्वत:च्या घरात नेले. त्यानंतर अत्याचार करताना मुलीने आरडाओरडा सुरू केला आणि त्याचवेळी तिचा लहान भाऊही रडू लागला. दोघांच्या आवाजामुळे 
सिराजची आई घटनास्थळावर धावत आली व तिने मुलीची सुटका केली. 

क्लिक करा- पोलिस ठाण्यात चालत आलेल्या प्लॉटींग व्यावसायिकाचा मृत्यू 

पोस्कोनुसार दंड, गुन्हा 
घडला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून भादंवि 376 (2) तसेच पोक्‍सोच्या विविध कलमान्वये पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील शरद बांगर यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात पीडित मुलीची साक्ष व इतर पुरावे महत्त्वाचे ठरले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने सिराज शेख याला दोषी ठरवून पोक्‍सो कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवस अतिरिक्त सक्तमजुरी, तर पोक्‍सोच्या कलम 10 अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

हे वाचलंत का?-ही बघ, तू केलेल्या चोरीची बातमी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused rapist of minor girl jail for five years