पोलिस ठाण्यात चालत आलेल्या प्लॉटींग व्यावसायिकाचा मृत्यू 

मनोज साखरे
Tuesday, 28 January 2020

शेंगुळे हे पंचावन्न ते साठ टक्‍के भाजले होते. घाटी रुग्णालयातून शेंगुळे यांना एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पुण्याहुन डॉक्‍टरही बोलाविण्यात आले. पण शरिरात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती सहायक निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी दिली. 

औरंगाबाद : प्लॉटच्या वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात प्लॉटींग व्यावसायिकावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना गुरुवारी (ता.23) सायंकाळी घडली होती.

यात गंभीर भाजलेला प्लॉटींग व्यावसायिकाचा मंगळवारी (ता. 28) पहाटे साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांविरुद्ध खूनाचा प्रयत्न झाल्याच्या दाखल गुन्ह्यात खूनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) असे मृताचे नाव आहे. ते प्लॉटींग व्यावसायिक होते. त्यांचा प्लॉट विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी चिकलठाणा भागातील सुंदरवाडी येथे गट नंबर 39-2 मध्ये वीस बाय तीस आकाराचा प्लॉट राजनगर, मुकुंदवाडी येथील स्वाती जाधव व गजानन जाधव या दाम्पत्यांना तीन लाख 22 हजारांत विक्री केला होता.

व्यवहारावेळी प्लॉटची मालकी सातबाऱ्यावर नोंद करून देण्याचे ठरले होते; परंतु सातबाऱ्यावर नाव लागू होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. 23 जानेवारीला दीडच्या सुमारास जाधव दाम्पत्य व एकजण शेंगुळे यांच्याकडे विश्रांतीनगर येथील कार्यालयात आले. तेथे त्यांच्यात वाद झाला. तिघांनी प्लॉटचे पैसे दे; अन्यथा तुला जाळून मारू अशी धमकी दिली.

त्यावर शेंगुळे यांनी आज एक लाख रुपये देतो, नंतर उर्वरित पैसे देतो, असे आश्‍वासन दिले; मात्र तिघांचे समाधान झाले नाही व त्यांनी अक्षरश: शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून पलायन केले होते. यानंतर संशयित गजानन दत्तूजी जाधव व स्वाती गजानन जाधव (रा. राजनगर) यांना जालना येथून अटक करण्यात आली. 

शर्थीचे प्रयत्नही अपयशी 
शेंगुळे हे पंचावन्न ते साठ टक्‍के भाजले होते. घाटी रुग्णालयातून शेंगुळे यांना एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पुण्याहुन डॉक्‍टरही बोलाविण्यात आले. पण शरिरात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती सहायक निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी दिली. 

याच अवस्थेत ते ठाण्यात आले होते... 
इंधन ओतून शेंगुळे यांना पेटवल्यानंतर त्यांनी मदतीची याचना करुनही कुणी वाहन थांबविले नव्हते. मदतही न मिळाल्याने ते पेटलेल्या अवस्थेत धावतच ठाण्यात पोचले होते यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर कलम वाढवून स्वाती व गजाननविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad The Murder Of A Plotting Businessman