esakal | औरंगाबाद : बेकायदा मोबाईल टॉवरवर तीन ठिकाणी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

mobail tower.jpg

महापालिकेच्या इशाऱ्यानंतरही कंपन्यांचे कारनामे सुरूच 

औरंगाबाद : बेकायदा मोबाईल टॉवरवर तीन ठिकाणी कारवाई

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील बेकायदा मोबाईल टॉवरचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. महापालिकेने वारंवार इशारा दिल्यानंतरही विविध कंपन्यांचे कारमाने सुरूच असून, गुरुवारी (ता. १९) दिवसभरात तीन ठिकाणी प्रशासनाने कारवाई केली. दोन ठिकाणी साहित्य जप्त करण्यात आले तर एका ठिकाणी नोटीस बजावण्यात आली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहर परिसरात बेकायदा मोबाईल टॉवरचे पेव फुटले आहे. महापालिकेची परवानगी न घेता, ज्या इमारतीवर टॉवर उभारले जाते तेथील स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता, टॉवर उभारण्यात आले आहेत. पाहता-पाहता बेकायदा टॉवरची संख्या पाचशेच्या वर गेली आहे. बेकायदा टॉवर महापालिकेच्या रेकॉर्डवर येईपर्यंत कुठलाही कर लागला जात नाही. त्यामुळे मोबाईल कंपन्यांचे फावते आहे. त्यामुळे अनेक कंपन्या रात्रीतून टॉवर उभारत असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले होते. महापालिका नागरिकांच्या तक्रारीनंतर बेकायदा मोबाईल टॉवरवर वारंवार कारवाई करत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परवानगी ने घेता टॉवर उभारू नका, असे इशारेही देण्यात आले. मात्र त्यानंतरही शहर परिसरात बेकायदा टॉवर उभारले जात आहेत. दहा वर्षांपासून बेकायदा मोबाईल टावरवर महापालिका कारवाई करत आहे. मात्र दुसरीकडे टॉवरची संख्या वाढतच आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार टॉवरची संख्या ६२२ एवढी आहे. त्यातील फक्त ८३ टॉवरला परवानगी आहे. मोबाईल टॉवरपोटी एकूण थकबाकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान नारेगाव येथे टॉवरचे बेकायदा काम सुरू असल्याची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी टॉवर उभारण्यासाठी वापरण्यात येणारे बांधकाम जप्त करण्यात आले. तसेच ब्रीजवाडी भागातील अंबिका दालमिल परिसरातील एअरटेल कंपनीचे टॉवर बंद करून साहित्य जप्त करण्यात आले. मिसरवाडी भागात एका टॉवरचे काम बंद करून संबधितांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई पदनिदेर्शित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद, रवींद्र देशमुख यांच्या पथकाने केली. 


(संपादन-प्रताप अवचार)