वृक्ष आधी डोक्‍यात वाढू द्या, जमिनीवर आपोआप वाढतील

सुशेन जाधव
गुरुवार, 9 जानेवारी 2020

संजय वनवे स्मृती संध्या आणि सह्याद्री देवराई आयोजित पहिल्या वृक्षसंमेलनानिमित्त कार्यक्रमात रंगकर्मी पुरस्कार वितरणप्रसंगी सयाजी शिंदे बोलत होते. हे संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. 

औरंगाबाद : एखादी गोष्ट मनातून करायची ठरविली, की ती करता येतेच. झाडांचंही तसंच आहे, वृक्षांची वाढ आधी डोक्‍यात वाढू द्या, मग जमिनीवर आपोआप झाडं वाढतील असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी बुधवारी (ता.आठ) तापडिया नाट्यमंदिरात व्यक्त केले. 

संजय वनवे स्मृती संध्या आणि सह्याद्री देवराई आयोजित पहिल्या वृक्षसंमेलनानिमित्त कार्यक्रमात रंगकर्मी पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. हे संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. 

पटकथालेखक अरविंद जगताप यांनी कार्यक्रमप्रसंगी सयाजी शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान जगताप यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना अभिनेते शिंदे म्हणाले, की माझ्या गावाला जंगलाचा वारसाच लाभलेला आहे. लहानपणी झाड तोडताना पाहिले, तेव्हापासून अस्वस्थ व्हायचं. एक दिवस वाटलं, की आपलं चुकलंच. आपण पैसा, संपत्ती, प्रसिद्धीच्या मागे लागलो आहोत, आता मात्र झाडं लावायला हवीत, जगवायला हवीत. हळूहळू झाडं लावायला सुरवात केली, एकाचे हजार, पाच हजार, दहा....अशी लाखांवर झाडं जगवलीत. जगात दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक आई आणि दुसरं झाडं.' 

हेही वाचा - 

दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

कार्यक्रमाला गायक गणेश चंदनशिवे, लेखक बालाजी सुतार, धनंजय चिंचोलीकर, शाहू पाटोळे, प्रेषित रुद्रवार, रमाकांत भालेराव, शिवराम घोडके, रवींद्र बनसोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

इच्छा विकत घेता येत नाही

अभिनेता म्हणून नाव कमावल्यानंतर गावातील लोकांनी म्हटले, की मंदिर बांधायला दहा लाख रुपये दे. त्यावर मार्ग काढत लहानसं मंदिरही बांधलं; मात्र उरलेल्या पैशातून झाडं लावली. ज्या झाडाखाली नाटकांची तालीम केली, ती आजही तिथे आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

जगातील पहिले वृक्षसंमेलन

आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलेच संमेलन होत आहे. यामध्ये जमेल ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पाण्याच्या टॅंकरची सोय करण्याबरोबरच कायमस्वरूपी मदत करण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले. याला प्रतिसाद देत काही व्यक्तींनी मोफत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी दाखविली.

झाडं राजीनामा देत नाहीत - जगताप 

अभिनेता शिंदे यांची मुलाखत घेताना अरविंद जगताप यांनीही झाडं लावण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती झाडं लावण्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. झाडं लावायला हवीत, ती कधीच राजीनामा देत नाहीत. जर नवऱ्याने वडाचं झाडं लावलं असेल तरच बायकोने वडाला फेऱ्या मारायच्या! असं जर केलं तरच ती जगतील.

यांना मिळाला पुरस्कार

नाट्य क्षेत्रातील मदन मिमरोट, कैलास टापरे यांना रंगकर्मी मित्र पुरस्कार तर प्रवीण पाटेकर यांना युवा रंगकर्मी पुरस्कार देण्यात आला. यावेळी पाच झाडांपासून 35 हजारांवर झाडे लावणाऱ्या विविध व्यक्ती, संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. 

धक्कादायक -  

तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण?

शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sayaji Shinde Leading Tree Plantation Movement In Beed Aurangabad News