ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पोतून एवढी उलाढाल (वाचा सविस्तर)

Advantage Maharashtra EXPO-2020 in Aurangabad
Advantage Maharashtra EXPO-2020 in Aurangabad

औरंगाबाद : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर (मसिआ) च्या वतीने नऊ ते 12 जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-2020' मध्ये सहभागी झालेल्या साडेचारशे उद्योजकांची दीडशे कोटींची उलाढाल झाली आहे. मंदीच्या काळामध्ये प्रदर्शनाने वेगळी ओळख निर्माण केली असून, अनेकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याची माहिती एक्‍स्पोचे समन्वयक सुनील कीर्दक यांनी दिली. 

श्री. कीर्दक म्हणाले, की लघुउद्योगांना व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि उद्योजकांना नवनवीन उत्पादने, तंत्रज्ञान यांची माहिती व्हावी याकरिता दर तीन वर्षांनी मसिआ हे प्रदर्शन भरविते. यंदाच्या एक्‍स्पोमध्ये 448 स्टॉल कंपन्यांनी लावले होते. यात एक लाख पाच हजार नागरिकांनी भेट दिली. नऊ हजार जणांनी उद्योगासाठी चौकशी केली. याचा सकारात्मक परिणाम होऊन दीडशे कोटी रुपयांचा व्यवसाय निर्मिती झाली आहे.

 415 स्टॉलधारकांनी पुढील प्रदर्शनात सहभागी 
यात फूड प्रोसेसिंग, मशिनरी, स्टॅंडर्स प्रॉडक्‍ट्‌सचा समावेश होता. एक्‍स्पोमध्ये स्टॉल लावणाऱ्या 448 पैकी 200 जणांनी एक्‍स्पोबद्दल समाधान व्यक्त केले. 180 जणांनी चांगला रिमार्क दिलाय. तर 60 स्टॉलधारकांनी प्रदर्शनात बदल करण्याच्या सूचना केल्या. इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि व्यावसायिक ग्राहक याबद्दल अजून सुधारणा कराव्यात अशा सूचना 25 स्टॉलधारकांनी केल्या. 415 स्टॉलधारकांनी पुढील प्रदर्शनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले असून, यातील काही जणांनी अधिक जागेची मागणी केली आहे. यावेळी मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, भगवान राऊत, मनीष अग्रवाल व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

संघटनेच्या मागण्या 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवर हे प्रदर्शन आयोजित करण्याच्या प्रयत्न असून, त्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता शासनाने औरंगाबादेत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारावे, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत रस्ते सुविधा द्यावे अन्यथा मनपाकडे असलेले हस्तांतरण एमआयडीसीकडे करावे अशी मागणी करीत गट नंबरमध्ये भाड्याने व्यवसाय करणाऱ्या लघुउद्योजकांना जागा द्या, असे झाल्यास त्यांना दोनशे कोटींची सबसिडी मिळू शकेल असा आशावाद कीर्दक यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com