हजारो वाहन परवाने बाद होण्याच्या मार्गावर 

photo
photo

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर आरटीओ कार्यालय सुरु झाले आहे. मात्र, ड्रायव्हिंग स्कुल सुरु करण्यासंदर्भात काहीही निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच संभ्रम आहे. दुसरीकडे वाहन परवान्याचा कोटा कमी केल्याने लॉकडाऊनच्या काळातील हजारो उमेदवारांचे वाहन परवाने बाद होण्याच्या मार्गावर आहेत. 
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर २० जूनपासून आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. तथापि, पूर्वीच्या तुलनेत तीस टक्केच काम सुरु आहे. आरटीओ सुरु झाल्यामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या संचालकांनी प्रशिक्षणाला सुरवात केली आहे. परंतु वाहतुक पोलीस ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांना अडवून परवान्याची मागणी करीत आहेत. आरटीओ कार्यालय सुरू झाले म्हणजेच ड्रायव्हिंग स्कूलही सुरू झाले असा स्कूल संचालकांचा समज झालेला आहे. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ऑक्टोबरपर्यत आजच बुक 

लॉकडाऊन काळातील जवळपास आठ ते दहा हजार परवाने प्रलंबित आहेत. ज्या वाहन परवान्याच्या मुदत लॉकडाऊनच्या काळात संपल्या आहेत, त्यांना ३० सप्टेंबरपर्यत मुदतवाढ दिलेली आहे. आता मात्र कार्यालय सुरु झाले असले तरीही केवळ ३० वाहनांचा कोटा असल्याने ऑक्टोबरपर्यतच्या तारखा आजच बुक झालेल्या आहेत. सप्‍टेंबर पर्यंत बाद होणाऱ्या वाहनधारकांना परवान्याची मुदत संपण्याच्या पूर्वीच तारीख घेणे आवश्यक आहे. मात्र आँक्टोंबर पर्यंत तारखा बुक असल्याने सध्यातरी हे हजारो वाहन परवाने बाद होण्याच्या मार्गावर आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कोटा दुप्पट करण्याची गरज 

लॉकडाऊनपूर्वी वाहन परवान्याचा शिकाऊ आणि पक्क्या वाहनांचा प्रत्येकी २५० कोटा होता. आता कार्यालय सुरु झाल्यानंतर केवळ तीस जणांचा कोटा असल्याने परवान्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांना तारीख मिळत नाही. ३० च्या कोट्यामध्ये नविन आणि जुने असे एकत्रीत असल्याने प्रतिक्षेत असलेल्यांवर अन्याय होत आहे. म्हणुनच पुर्वीप्रमाणे दोनशे ते अडीचशे वाहनांचा कोटा वाढवण्याची गरज आहे. परवान्याचा कोटा वाढवण्याची मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली. 


वाहन परवान्याचा कोटा कमी केल्याने मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये मुदत संपलेल्या परवानाधारकांना चाचणी साठी तारीख मिळत नाही. त्यामुळे वाहन परवान्याचा कोटा वाढवण्याची गरज आहे. ट्रान्सपोर्ट व हेवी व्हेईकल क्लाससाठीही इनवर्ड नंबर मिळत नसल्याने त्यांचे प्रशिक्षण थांबलेले आहे. 
-देवेंद्र पांडे, अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com