esakal | एटीएमची दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छता
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

देशभरासह, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढतो आहे. बँकांमध्ये ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेत त्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँक, केंद्र सरकारने बँकांना दिल्या

एटीएमची दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे बँकामध्ये विविध उपाययोजना करण्याच्या सूचना मंगळवारी (ता.१७) देण्यात आल्या. रोकड हाताळणी करणाऱ्या कॅशिअर यांना सॅनिटायझर, मास्क आणि शक्य झाल्यास ग्लोज वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक एटीएम दोन तासाला सॅनिटायझरने साफ करून घ्यावेत; तसेच बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे, आशी माहिती अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली. 

देशभरासह, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढतो आहे. बँकांमध्ये ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेत त्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँक, केंद्र सरकारने बँकांना दिल्या. त्यानुसार शहरातील, जिल्ह्यातील प्रत्येक बँकेने आपल्या पातळीवर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय बँक अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फसिंगद्वारे प्रत्येक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, अधिकिाऱ्यांची चर्चा करीत आढावा घेण्यात आला.

क्‍लिक करा : पाणीच नाय... तर स्वच्छतागृह वापरायचे कसे ?  

त्यात करोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत निर्देश दिले. यात प्रामुख्याने ग्राहकांशी थेट संपर्क येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी, डिजिटल व्यवहार वाढवित बँकांमधील गर्दी कशा पद्धतीने कमी करता येईल. यावर भर देण्याच्या सूचना केल्या. यामध्ये ग्राहकांशी अंतर ठेवून बोलावे, तोंडाला मास्क लावावा, साफसफाई वेळोवेळी करावी. कॅशिअरने रोकड हाताळताना हँड ग्लोज वापरावेत. बँकेत प्रवेश करताना सॅनिटायरचा वापर करावा. यासाठी लागणारा खर्च करण्याचे अधिकार बँक व्यवस्थपकाला देण्यात आले आहेत. 
हेही वाचा : थोर गणिती भास्कराचार्यांनी कुठे लिहिला लीलावती ग्रंथ..  
बायोमेट्रिक हजेरी बंद 
बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे बँकेतील कर्मचाऱ्यांनासाठी असलेली बायोमेट़िरक प्रणालीद्वारे होणारी हजेरी बंद केली आहे. त्याशिवाय बायोमेट्रीक डिवाईसचा इतर कारणांसाठी वापर करताना ते स्वच्छ ठेवण्यात यावेत. औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये विविध अठरा राष्ट्रियकृत बँकांच्या शंभरच्या आसपास शाखा आहेत. तीन हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. 

एटीएमची साफसफाई 
बँक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा ठिकाणीही काळजी कशी घेता येईल, याबाबत स्पष्ट करण्यात आले. बँकेच्या एटीएम प्रत्येक दोन तासांनी सॅनिटायझरने साफ करावे, अशा सूचना लीड बँकेने आहेत. एटीएम मशीनमध्ये की- बोर्ड, डिस्प्ले, कार्ड टाकण्याचे सॉकेट, पैसे ज्या ठिकाणाहून बाहेर येतात अशा ठिकाणी साफसफाई करण्यात यावी, अशा सूचना आहेत.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

 
कर्मचाऱ्यांच्या, ग्राहकांच्या काळजीबाबत आलेल्या सूचनांप्रमाणे बँकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही आवश्यकता असल्यावरच बँकेत यावे; अन्यथा डिजीटल बँकिंगचा पर्यायही वापरावा. 
- श्रीकांत कारेगावकर, मुख्य प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, औरंगाबाद.