esakal | सात वर्षीय चिमुकलीचे ओठ तोडत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी फरार, औरंगाबादेतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Rape`

नातेवाईकांसोबत झोपलेल्या सात वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (ता.) १६ रोजी भल्या पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपीने चिमुकलीचे ओठ तोडून गंभीर जखमी केले. मात्र सुदैवाने कोणाचीतरी चाहूल लागल्याने पुढील दुर्दैवी घटना टळली.

सात वर्षीय चिमुकलीचे ओठ तोडत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी फरार, औरंगाबादेतील घटना

sakal_logo
By
आर. के. भराड

वाळूज, (जि. औरंगाबाद): नातेवाईकांसोबत झोपलेल्या सात वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (ता.) १६ रोजी भल्या पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपीने चिमुकलीचे ओठ तोडून गंभीर जखमी केले. मात्र सुदैवाने कोणाचीतरी चाहूल लागल्याने पुढील दुर्दैवी घटना टळली.

खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान

वडगाव कोल्हाटी येथील साजापूर रस्त्यावर एका तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर काही सात वर्षीय चिमुकलीचे वडील, मामा व इतर नातेवाईक काम करतात. गेल्या आठवड्यात सात वर्षीय चिमुकली तेथे आली होती. शुक्रवारी (ता.१६) रात्री ती वडील, मामा व आजीसोबत पत्र्याच्या खोलीत झोपली. तर तीचे नातेवाईक काही मजूर निर्माणाधिन इमारतीच्या वरच्या मजल्यावर झोपले होते.

रात्री दीड वाजेच्या सुमारास एक नराधम आरोपी तेथे आला. त्याने झोपलेल्या मजुराचा एक मोबाईल चोरून घेतला. त्यानंतर आजी सोबत झोपलेल्या मुलीला चादरीसह उचलून नेऊन तिच्यावर शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे ओठ तोडून जखमी केले. दरम्यान कोणाचीतरी चाहूल लागली. आणि ही संधी साधून चिमुकलीने त्याच्या तावडीतून सुटत ओरडतच घराकडे पळाली. त्यामुळे शेजारी जागे झाले. हे लक्षात येताच आरोपीने पळ काढला.

कर्ज फेडणे मला शक्य नाही, माझ्या लहान भावाला सांभाळून घ्या, असे म्हणत तरुणाची आत्महत्या

घटनेनंतर नातेवाईकांनी चिमुकलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेद्वारे तिला उपचारासाठी दाखल केले. चिमुकलीवर घाटीत उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीची ओळख व शोध घेण्यासाठी परीसरातील सीसीटीव्ही खंगाळण्यात येत असून पोलीस आरोपीच्या मागावर आहे.

पोलीस चौकीची मागणी 
वडगाव कोल्हाटी व परिसरात दिवसेंदिवस चोऱ्या, मारामाऱ्या व अन्य गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिसरात पोलीस चौकी असल्यास येथील गुन्हेगारीस आळा बसेल. त्यामुळे वडगाव येथे पोलीस चौकी उभारण्यात यावी. अशी मागणी श्रीराम पवार, प्रकाश निकम, गजानन कटारे आदीसह वडगाव, बजाजनगर, क्रांतीनगर, छत्रपतीनगर या भागातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड