कर्ज फेडणे मला शक्य नाही, माझ्या लहान भावाला सांभाळून घ्या, असे म्हणत तरुणाची आत्महत्या. 

नवनाथ इधाटे
Friday, 16 October 2020

रामेश्वर नेहमी आपल्याला जमिन बागायती करायची आहे. यासाठी नविन विहीर खोदली पाहिजे असे नेहमी बोलत होता. या बँकांची कर्जमाफी झाली तर नविन कर्ज काढून विहीर खोदु असे घरी बोलायचा. परंतू वडीलांचे कर्जमाफीमध्ये नावच आले नाही. त्यामुळे तो नहमी नाराज असायचा. 

फुलंब्री (औरंगाबाद) : मला कर्ज फेडणे शक्य नाही, मी माझे जीवन संपवित आहे, माझ्या लहान भावाला सांभाळा असा फोन करुन युवा शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा या गावात ही धक्कादायक घटना घडली असून रामेश्वर तेजराव लहाने वय20 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.     

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सदरील घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लहाने यांचे वडील तेजराव लहाने यांच्यावर महाराष्ट्र बँक वडोदबाजार या बँकेचे सत्तर हजार रुपये व सहकारी सोसायटीचे पंचवीस हजार रुपये पीक कर्ज आहे. परंतु त्यांचे या दोन्हीही बँकेच्या कर्ज माफीमध्ये नाव न आल्याने ते आर्थिक अडचणीत होते. यंदाच्या पेरणीसाठी त्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तेजराव लहाने यांनी सांगितले की, रामेश्वर नेहमी आपल्याला जमिन बागायती करायची आहे. यासाठी नविन विहीर खोदली पाहिजे असे नेहमी बोलत होता. या बँकांची कर्जमाफी झाली तर नविन कर्ज काढून विहीर खोदु असे घरी बोलायचा. परंतू वडीलांचे कर्जमाफीमध्ये नावच आले नाही. त्यामुळे तो नहमी नाराज असायचा. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रामेश्वरने गुरुवारी सकाळी दहा वाजता बहीण, मामा यांना फोन लावून मी माझे जीवन संपवित आहे. माझ्या लहान भावाला जीव लावा असे बोलला. यावेळी पाहुण्यांनी त्वरित वडील व गावातील अन्य नातेवाईकांना फोन लावले. परंतु ते शेतात पोहचेपर्यंत रामेश्वर ने औषध घेतले होते. त्याला ताबडतोब फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. दुपारी चार वाजता शवविच्छेदन करून सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात चार बहीणी, एक भाऊ आई वडील असा परीवार असून त्याचा मनमिळाऊ स्वभाव व प्रत्येकाशी असलेले जिव्हाळा यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरील घटनेची वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth suicide Aurangabad news