औरंगाबाद : कोरोना रुग्णाची घाटीच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या

मनोज साखरे
Sunday, 27 September 2020

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ४२ वर्षीय कोविड रुग्णाने आत्महत्या केली. ही गंभीर आणि खळबळजनक घटना आज (ता. २७) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.

औरंगाबाद : औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ४२ वर्षीय कोविड रुग्णाने आत्महत्या केली. ही गंभीर आणि खळबळजनक घटना आज (ता. २७) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकासाहेब कणसे (वय ४२, रा. धनगाव, तालुका पैठण, जि. औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे. २१ सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कोविडचे उपचार सुरू होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कणसे यांनी इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या खोल जागेत उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस नातेवाईकांकडे चौकशी करीत आहेत. या घटनेने घाटी रुग्णालयात खळबळ निर्माण झाली. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर , वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हारबडे, सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी धाव घेतली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auranagabad GMCH news corona patient sucide