औरंगाबादेत १९ हजार ग्राहकांनी का नाकारले वीजबिल?

अनिलकुमार जमधडे
Saturday, 10 October 2020

  • पर्यावरणपूरक गो ग्रीनचा पर्याय, प्रत्येक बिलावर दहा रुपयांची सूट 

औरंगाबाद : महावितरणच्या कागदविरहित गो-ग्रीन वीजबिल (कागदविरहित) सुविधेवर महावितरणकडून दहा रुपयांची सवलत दिली जाते. मराठवाड्यात जवळपास वीस हजार ग्राहकांनी या गो-ग्रीन योजनेचा लाभ घेतला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
वीजग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारतील अशा सर्व ग्राहकांना प्रतिबिल १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबिल मिळते, त्याचप्रमाणे वीजबिलाचे जतन करणेही सोपे होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाइनसह विविध पर्याय आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. गो-ग्रीनचा पर्यायासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी लागणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अशी आहे परिस्थिती 
-औरंगाबाद परिमंडल ः ८,०९६ 
-लातूर परिमंडल ः ६,५२३ 
-नांदेड परिमंडल ः ४,८०९ 
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ः १९,४२८ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad 19 thousand customers no accepcted electricity bills