काय सांगता ! शाळाच गेली विद्यार्थ्यांच्या घरी, अन् तांड्यावर घडले असे. 

school aadul.jpg
school aadul.jpg

आडूळ (औरंगाबाद) : खेड्यापाड्यातील दुर्गम आणि विशेषतः तांड्यावरील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे. त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत 'शाळा आपल्या दारी' हा उपक्रम पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला आडुळ या शाळेने अतिशय प्रभावीपणे राबविला आहे. 

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे विषय मित्र ग्रुप स्थापन करून ऑफलाइन विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षणाची सोय केलेली आहे हे विशेष अधोरेखित करण्यासारखे आहे. या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब तसेच दुर्गम भागात मोबाईलचे नेटवर्क सुविधा उपलब्ध नसणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना तायडे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील गणित शिक्षक नागेश शिवलिंग चरपेलवार, लिपिक उदय देशपांडे त्यांच्या विज्ञान स्नातक वर्गमित्रांनी स्वतः आणि समाजातील दानशुरांकडून तब्बल तीस हजार रुपये गोळा करून विद्यार्थ्यांसाठी दोनशे पानांचे दोन हजार नोटबुक्स व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी केली.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या गावात तोंडाला मास्क व फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून दाभरूळ तांडा, दाभरूळ, देवगाव तांडा, शिवगड तांडा, अब्दुल्लापुर तांडा, खडकी तांडा,आडूळ तांडा आडूळ बुद्रुक व आडूळ खुर्द येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरपोच प्रत्येकी सहा नोटबुक याप्रमाणे समर्पित भावनेने वितरित केले. अब्दुल्लापुर तांडा येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विषय मित्रांना एक व्हाईट बोर्ड भेट दिला. पवन राठोड, सचिन राठोड, पृथ्वीराज चव्हाण व सचिन चव्हाण या माजी विद्यार्थ्यांना 'विषय मित्र' नेमून शाळेतील  विद्यार्थ्यांना ते सेवाभावी वृत्तीने शिक्षण देत आहेत.

हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकाश देणारा 

याकामी शाळेतील शिक्षक नागेश चरपेलवार, कैलास वाढवे, जयसिंग राठोड व अनिल चव्हाण हे शिक्षक दररोज सकाळी साडे सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या खाजगी वाहनाने पदरमोड करून विद्यार्थ्यांना नोटबुक वाटतात. कोविड-१९ विषयी जनजनजागृतीही करतात व त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतात. मोबाईल व नेटवर्क नसलेल्या विद्यार्थ्यांना विषय मित्र ऑफलाईन तर शाळेतील मुख्याध्यापिका चेतना तायडे यांच्यासह सर्व शिक्षक पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाराशर, रत्नमाला अंकमवार, ज्योती मादनकर, वैशाली तारो, कल्पना सोनवणे यासह सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना झूम ॲप द्वारे वेळापत्रकानुसार दररोज ऑनलाईन शिक्षण देत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे, स्वाध्याय, गृहपाठ देणे, गृहपाठ तपासणे सोबतच इतर विषय पूरक उपक्रम दिले जातात. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. असून हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकाश देणारा ठरत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com