गेवराई तांड्याजवळ ट्रक-रिक्षाचा अपघात, एकाचा मृत्यू.

apghat cartoon.jpg
apghat cartoon.jpg

औरंगाबाद : गेवराई तांड्याजवळ ट्रक आणि रिक्षाची आमने सामने धडक झाल्याने या भिषण अपघातात एक जणाचा मृत्यु झाला. मृत व्यक्तीचे नाव शेख रफिक असे आहे. तो रिक्षातला प्रवासी असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. 

या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  शनिवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान गेवराई तांड्याजवळ आयशर ट्रक (क्रमांक एम एच १९ झेड ०७१४) समोरून येत असलेल्या रिक्षाला (क्रमांक. एम. एच. २० ईएफ ७७२२) यांच्यात आमने सामने धडक झाली.

या घटनेत रिक्षा प्रवासी शेख रफिक यास अन्य तीन जणांना उपस्थितांनी घाटी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शेख रफिक याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com