esakal | 'बामु' च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरु डॉ. येवले म्हणतात...  
sakal

बोलून बातमी शोधा

bamu.jpg
  • चार दिवसात निर्णय घेऊ.
  • संबंधितांकडून माहिती घेणार.
  • विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा डोंगर राहणार उभा. 

'बामु' च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरु डॉ. येवले म्हणतात...  

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : ‘‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आजच आला आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांशी बोलू. ठोस निर्णयासाठी किमान चार दिवस लागतील. त्यानंतरच याबाबत अधिक बोलता येईल.’’ अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात येऊ नये, हा निर्णय शुक्रवारी (ता. २८) सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यावर विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील म्हणाले कि, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या साधारणत: ५० हजार इतकी आहे. याची तयारी लॉकडाऊनपुर्वीच झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तुकला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्याही १० हजारांच्या जवळपास आहे तर विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीचेही तितकेच विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. साधारणत: ७० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला (बाटु) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालये जोडली आहेत. मात्र अंतिम वर्षाचे विद्यार्थी अद्याप ‘बामु’कडेच आहेत. बाटुकडे चार जिल्ह्यातील एम.टेक. अभ्यासक्रमासाठी १०० च्या सुमारास विद्यार्थी आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा डोंगर
परीक्षेबाबत विद्यापीठाचा इथुन पुढे श्रीगणेशा होत आहे. विद्यापीठासोबत अनेक महाविद्यालयेही कोवीड सेंटर म्हणून कार्यरत आहेत. शारिरीक अंतर पाळण्यासाठी आसनव्यवस्था बदलावी लागणार आहे. त्यामुळे वर्गखोल्या अपुऱ्या पडणार आहेत. बरीच महाविद्यालये शहरात आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या राहण्याचा तसेच जेवणाचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. यावर कसा तोडगा काढायचा. यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Edit-Pratap Awachar