File Photo
File Photo

औरंगाबादेत चार वर्षीय मुलगा कोरोनाचा बळी! आतापर्यंत ३२७ जणांचे बळी,रुग्णसंख्या सात हजारपार! 

औरंगाबाद ः औरंगाबाद शहर-जिल्ह्यात कोरोनाकहर सुरुच असून रुग्णसंख्येचा झपाटा कायम असताना बळींचा आकडाही दिवसेंदवस वाढतोय. कोरोना व अन्य आजारांनी आणखी नऊ जणंचा मृत्यू झाला. त्यात सात पुरुष, दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, नांदेड, जालन्यात प्रत्येकी दोन, लातूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत घाटी रुग्णालयात २५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी २४७ बळी औरंगाबाद जिल्ह्यातील होते. शहरातील विविध खासगी रुग्णालयात ७८, जिल्हा रुग्णालयात दोन अशा एकूण ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या घाटीतील ११४ कोरोनाबाधीत रुग्ण गंभीर असुन ९७ रुग्णांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

वाळुज येथील ४७ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात २६ जूनला भरती करण्यात आले होते. २७ जूनला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा सहा जुलैला मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. त्यांना संधीवात होता. 

चेतनानगर येथील ५३ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात पाच जूलैला भरती करण्यात आले होते. सहा जुलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा सहा जुलैला मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब व किडनीचा आजार होता. 

वैजापुरातील इंदिरा नगर येथील ५५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एका खासगी रुग्णालयात ६ जुलैला सावरकर कॉलनीतील ५६ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. अन्य एका खासगी रुग्णालयात ७ जुलैला सिडको एन- आठ येथील ७८ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. 


शिवशंकर कॉलनीतील ४७ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.  दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात फाजलपुऱ्यातील ४५ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.  तानाजी चौक, शिवशंकर कॉलनीतील ६३ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

घाटी रुग्णालयात सहा जुलैला शरीफ कॉलनी येथील चार वर्षीय कोरोनाबाधीत मुलाचा सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाला. ३० जूनला गंभीर अवस्थेत त्याला घाटीत भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच्या मृत्युचे कारण डिस्सेमीनेटेड इंट्राव्हास्क्युलर कोॲग्युलेशन, ॲक्युट रेस्पीरेटरी डीस्ट्र्स सींड्रोम, सेप्टीक शाॅक, कोवीड १९ असे आहे. या मुलाच्या वडीलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या सात हजारपार! 
 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातहजार पार गेली आहे. आजही (ता. सात) १९४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. आजच्या बाधित रुग्णांपैकी औरंगाबाद शहरातील १३९ व ग्रामीण भागातील ५५ जण आहेत. यातही १०८ पुरूष तर ८६ महिला बाधित आढळल्या आहेत. 

आतापर्यंत एकूण ७ हजार १३४ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३ हजार ८२४ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आता २ हजार ९८३ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज २५३ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १४५ व ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com