सुखद ः त्या नवजात बाळाचा कोरोना चाचणी निगेटीव्ह, व्हिडीओ कॉलवरुन पाहिले आईनेबाळाला!

baby
baby

औरंगाबाद : नववा महिना भरत आलेला असताना तिच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडले. आता या जगात येणाऱ्या चिमुकल्यांचे कसे होणार, या प्रश्नाने सर्वांनाच ग्रासले; पण ‘घाटी’तील डॉक्टरांनी धीर देत या संकटकाळात तिची रविवारी (ता. तीन) नैसर्गिक प्रसूती केली. नवजात बाळाचीही कोरोना चाचणी केली या बाळाची चाचणी अहवाल अहवाल नेगेटिव्ह आला आहे. अशी माहिती शासकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आज दिली. 

इंदिरानगर बायजीपुरा येथील महिलेची नैसर्गिक प्रसूती शनिवारी दुपारी १२ वाजता झाली. मातेचा रिपोर्ट कोविड पॉझीटीव्ह आल्याचे निष्पन्न झाल्या नंतर लगेच बाळाला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल वॉर्डातील एनआयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. बाळाचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे.

बाळाची संपूर्ण काळजी कर्तव्यावरील परिचारिका व डॉक्टर घेत आहेत. बाळाच्या आजीची तपासणी नेगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना पूर्ण खबरदारी घेऊन बाळाकडे जाता येणार आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या स्वतः बाळाची शुश्रुषा समाधानकारक असल्याची खात्री करीत आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

प्राध्यापक डॉ. एल. एस. देशमुख व इतर नवजात शिशु विभागातील अध्यापक बाळाची देखभाल तत्परतेने करीत आहेत. बाळाचे आजोबा व इतर नातेवाइकांशी फोनद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे.  

व्हिडीओ कॉलवरुन पाहिले बाळाला
आईचा रिपोर्ट कोविड पॉझीटीव्ह आल्यानंतर तिची व बाळाची ताटातूट झाली आहे. हे घाटीतील डॉक्टरांना बघवले गेले नाही, त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे आईला बाळ दाखविण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात १८ एप्रिलला मुंबईतून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली होती. ही राज्यातली दुसरी, तर जगातली पाचवी प्रसूती ठरली होती. ती महिलाही आता कोरोनामुक्त झाली असून, बाळाचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे.

त्यानंतर बायजीपुरा येथील २८ वर्षीय महिला रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात दाखल झाली. ‘आयसीएमआर’च्या (भारतीय वैद्यक परिषद) निर्देशानुसार अतिबाधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची ‘कोविड-१९’ची चाचणी करण्यास बंधनकारक करण्यात आले.

बायजीपुरा या अतिबाधित क्षेत्रातीलच ही २८ वर्षीय गर्भवती महिला असल्याने तिची कोविड चाचणी करण्यात आली. त्यानंतर डॉ. प्रशांत भिंगारे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. रविवारी सकाळी या महिलेने नैसर्गिक प्रसूतीद्वारे गोंडस मुलीला जन्म दिला. 

प्रसूतीनंतर आईचा अहवाल पॉझिटिव्ह 
मुलीचे वजन दोन किलो आठशे ग्रॅम आहे, बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले. या महिलेच्या स्वॅबचा अहवालही रविवारी सकाळी प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह आला.
 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com