औरंगाबाद : घर बांधण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून भावानेच काढला भावाचा काटा 

khun.jpg
khun.jpg

औरंगाबाद : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये न दिल्याने मोठ्या भावाने वकील असलेल्या लहान भावाच्या छातीत सुरा भोसकून खून केल्याची खळबळ जनक घटना शुक्रवारी (ता. २४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जवाहरनगर भागात घडली. खून केल्यानंतर मारेकरी भाऊ पसार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सुर्यप्रकाश ठाकूर (वय ५३, रा.परितोष विहार, जवाहरनगर) असे मृत वकिलांचे नाव आहे. तर वेद प्रकाश ठाकूर (वय ५६ रा.पैठण) असे भावाचा खून करुन फरार झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. 

या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सूर्य प्रताप आणि वेद प्रकाश हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. वेद प्रकाश हा पैठण येथे राहतो, तर मृत सूर्यप्रकाश हे औरंगाबाद येथे राहतात. ते एका कंपनीमध्ये लीगल ॲडव्हायझर म्हणून काम करतात. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास मोठा भाऊ वेद प्रकाश हा पैठणहून औरंगाबादला आला होता.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
दोघेही घरात बसले त्यावेळी वेदप्रकाश ने घर बांधण्यासाठी दोन लाख दे अशी मागणी लहान भाऊ सुर्यप्रतापकडे केली. यावेळी चहासाठी घरातील दूध संपल्याने सूर्य प्रताप यांच्या पत्नी अशा ठाकूर या दूध आणण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील शेजाऱ्यांकडे गेली होती. सुर्यप्रकाश यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार देताच, दोघांमध्ये वाद निर्माण झाला. राग अनावर झाल्याने वेदप्रकाशने सुर्यप्रकाशवर धारदार सुऱ्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. 

सुर्यप्रकाश रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडताच वेदप्रकाशने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे काढून घरातील भावाचे कपडे घातले. त्यानंतर तो घराची कडी लावून पसार झाला. घरकाम करणाऱ्या महिलेने वेदप्रकाशला पायरीवरून पळताना पाहिले, तिला काहीतरी घडले असा संशय आल्याने तीने ही बाब अशा ठाकूर यांना सांगितली.

त्यानंतर दोघींनी घरात जाऊन पाहिले असता सुर्यप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. त्यांना तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com