esakal | Corona-Virus : औरंगाबादेत तब्बल सहा लाख लोकांना 'काढा'... वाचा सविस्तर..!  
sakal

बोलून बातमी शोधा

roti bank.jpg

रोटी बॅंक सेवा ट्रस्ट सहा वर्षांपासून सामाजिक काम करत आहे. कोरोना महामारीतही या ट्रस्टने हिरिरीने पुढाकार घेतला आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, कोरोनाशी लढण्याची त्यांच्यात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी मालेगाव येथे यशस्वी ठरलेला काढा शहरात उपलब्ध करून दिला आहे. मालेगावातील युनानी मनसुरा काढा घेतल्याने मालेगावकरांनी कोरोनावर मात केली.

Corona-Virus : औरंगाबादेत तब्बल सहा लाख लोकांना 'काढा'... वाचा सविस्तर..!  

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद  : कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. त्यांच्या जोडीला स्वयंसेवी संस्थाही आपापल्या परीने हातभार लावत आहेत. कोरोनाला हरवायचे असेल तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे रोटी बँक सेवा ट्रस्ट ही संस्था शहरात २५ ठिकाणी स्टॉल लावून युनानी काढा तयार करून गरजवंतांना मोफत वाटप करत आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  
रोटी बॅंक सेवा ट्रस्ट सहा वर्षांपासून सामाजिक काम करत आहे. कोरोना महामारीतही या ट्रस्टने हिरिरीने पुढाकार घेतला आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, कोरोनाशी लढण्याची त्यांच्यात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी मालेगाव येथे यशस्वी ठरलेला काढा शहरात उपलब्ध करून दिला आहे. मालेगावातील युनानी मनसुरा काढा घेतल्याने मालेगावकरांनी कोरोनावर मात केली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

हा काढा रोटी बँक ट्रस्टकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून (ता.२२) हा काढा मोफत देण्यात येत आहे. यासाठी शहरात रोटी बँक जिन्सी, काल्डा कॉर्नर, जुना मोंढा, टिळकपथ, नारेगाव, मिसरवाडी, शहाबाजार, लोटा कारंजा आदी ठिकाणी स्टॉल उभारून मोफत वाटण्यात येत आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
ट्रस्टचे अध्यक्ष युसूफ मुकाती म्हणाले, की गेल्या सहा दिवसांत ९० हजार १०० लोकांना या काढ्याचे वाटप करण्यात आले आहे. २५ दिवस काढा वाटप करण्यात येणार आहे. तीन टप्प्यात शहरातील ६ लाख लोकांना मोफत काढा देण्याचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. 
Edited by pratap awachar

go to top