Corona Update : औरंगाबादेत १११ जण बाधित, सध्या ८२९ रुग्णांवर उपचार  

 corona young.jpg
corona young.jpg

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) दिवसभरात १११ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४२ हजार ७५७ वर पोचली. सध्या एकूण ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
बरे झालेल्या ८३ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील ६८, ग्रामीण भागातील १५ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ४० हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एक हजार १३८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

शहरातील बाधित 
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः नगरनाका (२), पन्नालालनगर (१), माळीवाडा (१), देवळाई रोड (१), शिवाजीनगर (१), कांचनवाडी (१), पडेगाव पोलिस कॉलनी (१), गुलमोहर कॉलनी, पडेगाव (१), शिवकॉलनी, मयूर पार्क (१), शिवशंकर कॉलनी (१), एसबीआय सिडको (१), कैसर कॉलनी (१), चिंतामणी कॉलनी (१), म्हस्के गल्ली, पडेगाव (१), मनपा परिसर (१), न्यू गणेशनगर (१), संकल्पनगर, जाधववाडी (२), पारिजातनगर (२), एन दोन सिडको (१), चिकलठाणा (१), शहानूरवाडी (२), एमआयटी स्वामी विवेकानंद अकादमी (१), एमआयटी शाळा (१), बीड बायपास (३), पेशवेनगर (१), जवाहर कॉलनी (१), एन तीन सिडको (१), हर्सूल, पिसादेवी (१), संत ज्ञानेश्वरनगर, सिडको (१), द्वारकानगर (१), घाटी परिसर (१), जाधववाडी (१), जालाननगर (१), एन सहा, सिडको (१), गजाननकॉलनी (१), एन पाच, सिडको (१), देवळाई चौक (१), सर्वेश्वरनगर (१), सातारा परिसर (२), आकाशवाणी (१), गारखेडा परिसर (१), अन्य (४१). 

ग्रामीण भागातील बाधित ः पिंपळवाडी, पैठण (१), बाजारसावंगी (१), लोणी (१), पैठण (१), भालगाव (१), शिक्षानगर, सिल्लोड (१)ुप, अन्य (१६). 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com