CORONA UPDATE : औरंगाबादेत आज १३८ रुग्ण कोरोनाबाधित, आता २ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु 

मनोज साखरे
Saturday, 4 July 2020

आज सकाळच्या सत्रात १३८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील १०१आणि ग्रामीण भागातील ३७ बाधित रुग्ण आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून नेहमी दोनशे जण बाधित होत असताना आज (ता. ४) बाधित होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आज सकाळच्या सत्रात १३८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील १०१आणि ग्रामीण भागातील ३७ बाधित रुग्ण आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
आजच्या एकूण १३८ बाधितांमध्ये ७८ पुरूष आणि  ६० महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ४०२ कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार १२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल घेण्यात आलेल्या एकूण ७९५ स्वॅबपैकी १३८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

आज शहरात आढळलेले १०१ रुग्ण : 

रघुवीर नगर (१), आलमगीर कॉलनी (१), हर्सुल (३), शाह बाजार (१), मुकुंदवाडी (१), आंबेडकर नगर (१), नवाबपुरा (३), लोटा कारंजा (१), बाबू नगर (५), जाधववाडी (१), गुलमोहर कॉलनी (५), देवळाई परिसर (२), कांचनवाडी (४), सहकार नगर (१), रेल्वे स्टेशन परिसर (२), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (२), उल्कानगरी, गारखेडा (२), बंबाट नगर (२), मिसारवाडी (८), हर्ष नगर (१), एन बारा (१), एन अकरा, सिडको (३), नवजीवन कॉलनी (२), हडको (१), छावणी (२), एमजीएम परिसर (१), पडेगाव (३), गजानन कॉलनी (१०), पद्मपुरा, कोकणावाडी (३), गादिया विहार (२), बुड्डी लेन (१), सिडको (४), तारक कॉलनी (२), उस्मानपुरा (१), क्रांती चौक (२), राम नगर (१), समता नगर (२), मिलिंद नगर (१), अरिहंत नगर (५),  विठ्ठल नगर (६),  शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क (१)

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

आज ग्रामीण भागातील आढळलेले ३७ रुग्ण

रांजणगाव (२), गोंदेगाव (१), डोंगरगाव (१), द्वारकानगरी, बजाज नगर (२), वाळूज महानगर सिडको, बजाज नगर (५), जिजामाता सो., वडगाव (१), जीवनधारा सो., बजाज नगर (३), सिडको महानगर (१), सपना मार्केट जवळ, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), इंड्रोस सो., बजाज नगर (१), विश्वविजय सो., बजाज नगर (१), कृष्णकोयना सो., बजाज नगर (२), वडगाव, बजाज नगर (२), धनश्री सो., बजाज नगर (१), सायली सो., बजाज नगर (१), प्रताप चौक, बजाज नगर (२), श्रीराम सो., बजाज नगर (१), शनेश्वर सो., बजाज नगर (१), वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर (१), साजापूर (१), सारा परिवर्तन सावंगी (३), कुंभारवाडा, पैठण (१) फत्ते मैदान, फुलंब्री (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर
सुटी झालेले रुग्ण   - ३१२६
उपचार घेणारे रुग्ण - २९८७
एकूण मृत्यू          -२८९
आतापर्यंतचे बाधित - ६४०२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona update 138 new corona positive