esakal | Corona : औरंगाबादेत आज पुन्हा १६६ जणांना कोरोनाची बाधा, आतापर्यंत झाले ४ हजार ३३ जण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात असून आज (ता. ९)  जिल्ह्यात सकाळच्या सत्रातच १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात औरंगाबाद महापालिका  हद्दीतील १०१ व ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे.

Corona : औरंगाबादेत आज पुन्हा १६६ जणांना कोरोनाची बाधा, आतापर्यंत झाले ४ हजार ३३ जण बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात असून आज (ता. ९)  जिल्ह्यात सकाळच्या सत्रातच १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात औरंगाबाद महापालिका  हद्दीतील १०१ व ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

आज अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यात ९० पुरूष व ७६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४ हजार ३३ रुग्ण बरे झालेले आहेत. एकूण ३३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३ हजार १४१ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

औरंगाबाद महापालिका हद्दीतील बाधित १०१ रुग्ण

कांचनवाडी (१), मार्ड हॉस्टेल परिसर (१), पद्मपुरा (१), अविष्कार कॉलनी एन सहा (१), जटवाडा रोड (१), जयसिंगपुरा (२),  राम नगर (१), बालाजी नगर (१), शुभमंगल विहार (१), विशाल नगर (२), एन बारा सिडको (१), एन नऊ सिडको (२), स्वामी विवेकानंद नगर (४), रमा नगर (९), विठ्ठल नगर (३), रेणुका नगर (३), अमृतसाई प्लाजा (२), जय भवानी नगर (१), एन बारा हडको (१), पवन नगर (१), किर्ती सो., (३), रायगड नगर (९), मिसारवाडी (१), म्हाडा कॉलनी (१), सातारा परिसर (२), गजानन कॉलनी (१), चिकलठाणा (१), एन अकरा, सिडको (१), मुकुंदवाडी (१), संजय नगर (१), अजब नगर (६), गजानन नगर (२), श्रद्धा कॉलनी (१), लक्ष्मी कॉलनी (२), भक्ती नगर (४), शिवशंकर कॉलनी (१), हनुमान नगर (१), अरिहंत नगर (३), बंजारा कॉलनी (१), शिवाजी नगर (१), जाधववाडी (३), पुंडलिक नगर (१), खोकडपुरा (७), नारेगाव (२), सेव्हन हिल (१), टाईम्स कॉलनी (१), राम नगर (१), जाधववाडी (१), विजय नगर (१), गजानन नगर, गारखेडा परिसर (१) 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील बाधित ६५ रुग्ण

कन्नड (१), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (१), अजिंठा (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (६), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (४), जय भवानी चौक, बजाज नगर (४), गणेश सो., बजाज नगर (१),  जगदंबा सो., वडगाव (१), सिडको वाळूज महानगर एक (२), फुले नगर, पंढरपूर (१), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (१), द्वारकानगरी, बजाज नगर (१), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (१), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (२), संगम नगर, बजाज नगर (५), वडगाव, बजाज नगर (२), वळदगाव, बजाज नगर  (२), नंदनवन सो., बजाज नगर (२), सारा किर्ती, बजाज नगर (१), नवजीवन सो., बजाज नगर (२), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (१), वंजारवाडी (८), शिवशंभो सो., बजाज नगर (१), सावता नगर, रांजणगाव (१),  हतनूर, कन्नड (१), नागापूर, कन्नड (१), कारडी मोहल्ला, पैठण (३), कुंभारवाडा, पैठण (८) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

कोरोना मीटर

सुटी झालेले - ४०३३
उपचार घेणारे - ३१४१
एकूण मृत्यू     - ३३०
---------
आतापर्यंत बाधित - ७५०४