Corona Update : औरंगाबादेत आज सकाळी ३४ रुग्ण बाधित, एकूण ८ हजार १५९ रुग्ण झाले बरे 

मनोज साखरे 
Sunday, 26 July 2020

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार १५९ बरे होऊन घरी गेले. एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील आज (ता. २६) सकाळच्या सत्रात ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३१ व ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार १५९ बरे होऊन घरी गेले. एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहरातील बाधित ३१ रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) :

नक्षत्रवाडी (२), भावसिंगपुरा (१), छत्रपती नगर, बीड बायपास (१), राजीव गांधी नगर (१), छावणी परिसर (३), पन्नालाल नगर (३), पद्मपुरा (१), खोकडपुरा (१), टाऊन सेंटर (२), पंचशील नगर (५), अयोध्या नगर (२), ठाकरे नगर, एन दोन (१), चेलिपुरा (१), एन दोन सिडको (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), हर्सुल (३), बन्सीलाल नगर (२) 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 
ग्रामीण भागातील बाधित ३ रुग्ण 
वैजापूर (१), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१) 

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ८१५९
  • उपचार घेणारे       -  ४३४६
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४३७
  • एकूण बाधित        - १२९४२
     

edited by pratap awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 34 positive increase