esakal | लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी औरंगाबादेत आज ६४ रुग्णांची वाढ, तर ३ हजार ९६ रुग्णांवर उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आज जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या ८७३ स्वॅबपैकी ६४ रुग्णांचे (३१ पुरूष, ३३ महिला) अहवाल  पॉझिटिव्ह  आले. आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या ८२८० झाली आहे. जिल्ह्यात ४८३४ रुग्ण बरे झाले, असून ३५० जणांचा मृत्यू झाल्याने ३०९६ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी औरंगाबादेत आज ६४ रुग्णांची वाढ, तर ३ हजार ९६ रुग्णांवर उपचार सुरू

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शुक्रवारपासून (ता.१०) शहरात लागू करण्यात आलेला जनता कर्फ्यूचा परिणाम दिसू लागला आहे. नियमित सकाळच्या सत्रात दीडशेहून अधिक येणारी रुग्णवाढीची संख्या रविवारी (ता.१२) शंभराच्या आत आली आहे. आज जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या ८७३ स्वॅबपैकी ६४ रुग्णांचे (३१ पुरूष, ३३ महिला) अहवाल  पॉझिटिव्ह  आले. आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या ८२८० झाली आहे. जिल्ह्यात ४८३४ रुग्ण बरे झाले, असून ३५० जणांचा मृत्यू झाल्याने ३०९६ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

आज सकाळी महापालिका  हद्दीतील रुग्ण (५३) :
छावणी (२), सादात नगर (१), गारखेडा (१), वसंत नगर (१), हनुमान नगर (१), शिवाजी नगर (१), शिवशंकर कॉलनी (१), जाधववाडी (१), सुराणा नगर (१), रशीदपुरा (१), टीव्ही सेंटर (१), केसरसिंगपुरा (९), पद्मपुरा (१), कैलास नगर (१), सिडको एन अकरा (२), हडको एन अकरा (२), नवनाथ नगर (२), रेल्वे स्टेशन परिसर (१), रेणुका नगर, गारखेडा (१), इंदिरा नगर, गारखेडा (४),  एन आठ (१), सातारा परिसर (१),  मुकुंदवाडी (१), नक्षत्रवाडी (२), गिरिजा विहार, पैठण रोड (१), शांतीपुरा (१),  मिसारवाडी (७), नागेश्वरवाडी (२), बाबर कॉलनी (२), 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

ग्रामीण भागातील रुग्ण (११) : 
वाळूज एमआयडीसी (१), हतनूर, कन्नड (१), नरसिंगपूर, कन्नड (१), करमाड (१), गोदावरी कॉलनी, गंगापूर (४), कुंभार गल्ली, वैजापूर (२), मस्की हायवे परिसर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

केसरसिंगपुरा सर्वाधिक रुग्ण
शहरातील केसरसिंगपुरा भागात सर्वाधिक नऊ रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ दाट वस्ती असलेल्या
 मिसारवाडी भागात सात रुग्ण आढळले. तर ग्रामीण मध्ये गंगापूर मधील गोदावरी कॉलनीत चार रुग्ण आढळून आले.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

कोरोना मीटर
उपचार सुरू  -३०९६ 
बरे झालेले   -४८३४
मृत्यु       -३५०
एकूण    -८२८०

संपादन : प्रताप अवचार