CORONA UPDATE : औरंगाबादेत आज ७७ कोरोनाबाधित, ३ हजार १२८ रुग्णांवर उपचार सुरु 

मनोज साखरे
Tuesday, 7 July 2020

आतापर्यंत एकूण ७ हजार १७ जण कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३ हजार ५७१ रुग्ण बरे झाले आहेत.  एकूण ३१८ रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ३ हजार १२८ जणांवर उपचार सुरू आहेत. आज चाचणी घेतलेल्या ७२५ स्वॅबपैकी ७७ अहवाल पॉझिटिव्ह आले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून आज (ता. ७) सकाळच्या सत्रात ७७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. दरदिवशी सकाळी येणाऱ्या पॉझिटिव्ह अहवालापैकी आजची संख्या कमी आहे. बाधित रुग्णांत औरंगाबाद शहरातील ७२ व ग्रामीण भागातील पाच जण आहेत. यातही ३७ पुरूष तर ४० महिला बाधित आढळल्या आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
आतापर्यंत एकूण ७ हजार १७ जण कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३ हजार ५७१ रुग्ण बरे झाले आहेत.  एकूण ३१८ रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ३ हजार १२८ जणांवर उपचार सुरू आहेत. आज चाचणी घेतलेल्या ७२५ स्वॅबपैकी ७७ अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

औरंगाबाद शहरातील बाधित ७२ रुग्ण
घाटी परिसर (१), बेगमपुरा (४), सुरेवाडी (१), पिसादेवी, गौतम नगर (३), बुढीलेन (२), जटवाडा रोड (३), कांचनवाडी (१), आंबेडकर नगर, एन सात (२०), सातारा परिसर (४), विष्णू नगर (२), न्यू हनुमान नगर (१),  विजय नगर (११), विशाल नगर (१), गौतम नगर (१), लोटा कारंजा (२), नागेश्वरवाडी (३), नारळीबाग (६), एकनाथ नगर (३), चेलिपुरा काझीवाडा (२), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (१) 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील पाच बाधित रूग्ण
हतनूर, कन्नड (१), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (४) या भागातील कोरोनाबाधित आहेत

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक  

कोरोना मीटर

  • सुटी झालेले रुग्ण    - ३५७१
  • उपचार घेणारे रुग्ण - ३१२८
  • एकूण मृत्यू             - ३१८
  • आतापर्यंतचे बाधित - ७०१७

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 77 positive increase