औरंगाबाद : कोरोनाने घेतला माजी नगरसेवकाचा बळी, तर ग्रामीण भागातील ३७ रूग्णांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिकांच्या मदतीसाठी काम करणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागला होत आहे. नितीन साळवे यांच्यासह अन्य दोन माजी नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून, मंगळवारी (ता. सात ) एका माजी नगरसेवकाचा बळी घेतला. शिवसेनेचे उत्तम नगर बौध्‍द नगर वाँर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी याचा मृत्यू झाला. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिकांच्या मदतीसाठी काम करणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागला होत आहे. नितीन साळवे यांच्यासह अन्य दोन माजी नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आला होता. साळवी यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अन्य दोन नगरसेवकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

जिल्ह्यात ३२४५ रुग्णांवर उपचार सुरू 
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी ग्रामीण भागातील ३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये २४ पुरूष, १३ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ७१३४ कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत. ३१८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ३२४५ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील रूग्ण
सारा किर्ती, वडगाव (२), पाटोदा (२), अयोध्या नगर, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (१), गणपती विसर्जन विहार, बजाज नगर (१), मनजित प्राईड सिडको, बजाज नगर (३), सर्वोदय सो., बजाज नगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (२), साई प्रतीक्षा अपार्टमेंट, बजाज नगर (१), विश्वविजय हाऊसिंग सो., बजाज नगर (१), बजाज नगर (३), सिडको महानगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (१), साक्षी नगरी, बजाज नगर (२), द्वारकानगरी, बजाज नगर (३),  कृष्ण कोयना सो., बजाज नगर (२), संगम नगर, वडगाव (१), नीलकमल सो., बजाज नगर (१), रांजणगाव, बजाजनगर (२), हडको, बजाज नगर (१), कन्नड बाजारपेठ (१), तहसील क्वार्टर, कन्नड (१), विहामांडवा, पैठण (१), पळसखेडा, सोयगाव (२), रांजणगाव, गंगापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona Update ex nagarsevak corona Death