esakal | औरंगाबादेत कोरोनामुळे चार जणांचा मुत्यू; बळींचा आकडा ६२६ वर
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

जिल्ह्यात आज ता.२२ रोजी कोरोनाचा उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत जिल्हात कोरोनामुळे ६२४ जणांचा मृत्यु झाला.

औरंगाबादेत कोरोनामुळे चार जणांचा मुत्यू; बळींचा आकडा ६२६ वर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हात कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रशासनाच्या पातळीवर उपाय-योजना करण्यात येत आहे. असे असले तरी रुग्णवाढीबरोबर कोरोनामुळे मृत्यू पडणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आज ता.२२ रोजी कोरोनाचा उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत जिल्हात कोरोनामुळे ६२४ जणांचा मृत्यु झाला. शनिवारी (ता.२२) १४६ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. अशी माहीती घाटी रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. 

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात 

कोरोनामुळे आज दिवसभरात तीन तर काल एक असे तीन पुरुष आणि महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्युदरात वाढ होत चालाली आहेत. गारखेडा येथील ४५ वर्षीय रुग्णास गुरुवारी (ता.२०) उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा शनिवारी (ता.२२) पहाटे उपाचारा दरम्यान मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी
माहेतपूर (औरंगाबाद) येथील ४० वर्षीय रुग्णास गुरुवारी (ता.२०) घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा शनिवारी (ता.२२) सकाळी आडे आठ वाजता मृत्यू झाला. यशवंत नगर, पैठण येथील ५० वर्षीय रुग्णांस शनिवारी (ता.२२) घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिकठाण, गंगापुर बुधवारी (ता.१९) त्यांचा शुक्रवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता मृत्यू झाला. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

कोरोना मीटर 
उपचार घेणारे रुग्ण - ४४१६ 
बरे झालेले रुग्ण  -१५१५२ 
मृत्यू    --६२६ 
एकूण -- २०१९०