Coronavirus : औरंगाबादेत आणखी तीन बाधितांचा मृत्यू; आत्तापर्यंत १० हजार १९२ रुग्ण झाले बरे  

प्रताप अवचार
Saturday, 1 August 2020

एकूण कोरोना बधितांची संख्या १४ हजार १९२ वर पोहचली आहे. त्यापैकी १०,१९२  बरे झाले. ४७८ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद : आज सकाळच्या सत्रात ६९ रुग्णांची वाढ झाली. तर मागील चोवीस तासात घाटी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अधिष्ठाता कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

एकूण कोरोना बधितांची संख्या १४ हजार १९२ वर पोहचली आहे. त्यापैकी १०,१९२  बरे झाले. ४७८ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

मृत्यू मध्ये येथील रुग्णांचा समावेश 

१) बजाजनगर वाळूज येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला २५ जुलै रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार दरम्यान ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. 

२) रांजणगाव वाळूज येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला १३ जुलै रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार दरम्यान ३१ जुलै रात्री ८ वाजता मृत्यू झाला. त्यांना हायपरटेंशनचा विकार जडलेला होता. 

३) सिल्कमिल कॉलनी येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाला १९ जुलै रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार दरम्यान ३१ जुलै दुपारी २ वाजून १५ मिनीटांनी मृत्यू झाला. त्यांना डायबेटीज आणि मेलीटस हा विकार जडलेला होता. 

आज आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे - 
आज महापालिका हद्दीत ४३ तर ग्रामीण भागात २६ रुग्णांची वाढ झाली आहेत. अँटिजेन टेस्टमुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रुग्णांची संख्या तात्काळ  कळू लागली आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

आज महापालिका हद्दीत  

छावणी (१), एनएच हॉस्टेल, घाटी परिसर (१), बन्सीलाल नगर (३), उस्मानपुरा (१), बजाज नगर (१), पद्मपुरा (८), शिवाजी नगर (२), म्हाडा कॉलनी (३), सावित्री नगर, चिकलठाणा (१), बालाजी नगर (२), जवाहर कॉलनी (१), सिंधी कॉलनी (१), पुंडलिक नगर (५), रमा नगर (१), शिल्प नगर (१), छत्रपती नगर (१), मिटमिटा (३), जहागीरदार कॉलनी (१), मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी (२), विजय नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा (२), सदाशिव नगर, सिडको (१), अन्य (१) असे ४३ जण वाढले आहेत.

ग्रामीण मधील रुग्ण

ऋषीकेश नगर, रांजणगाव (१), अजिंठा (१), वांजोळ, सिल्लोड (१), रांजणगाव (१),पानवडोद, सिल्लोड (१), मारोती नगर, गंगापूर (१), गंगापूर (१), शांतीनाथ सो., आकाश विहार, बजाज नगर (१), पारिजात सो., बजाज नगर (१), देवदूत सो., बजाज नगर (२), पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाज नगर (१), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (१), बकवाल नगर, नायगाव (१), सावता नगर, रांजणगाव, वाळूज (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), लेन नगर, वाळूज (२), सोनवाडी नगर, कन्नड (१), दाभाडी, कन्नड (१), हतनूर, कन्नड (१), बाजारसावंगी, खुलताबाद (२), पाचोड, पैठण (१), जोगेश्वरी, रांजणगाव (१), सोनार गल्ली, गंगापूर (१)   असे एकूण २६ रुग्ण वाढले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update three corona patient death in gmch